
राज्यातील दुध संघानी गायीच्या दुधाच्या भावात वाढ केली आहे. आता त्याच पावलावर पाऊल ठेवून कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ अर्थात गोकुळनेही दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गायीच्या दुधात प्रति लिटर 2 रूपये भाव वाढ करण्याचा निर्णय दूध संघाने घेतला आहे. हा भाववाढ फक्त मुंबई आणि पुण्यासाठी लागू असेल. या पुढे मुंबई आणि पुण्यात गोकुळचे गायीचे दूध प्रतिलिटर 54 रूपये ऐवजी 56 रूपयांनी मिळेल. अशी माहिती संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटीर 40 रूपये भाव मिळावा अशी मागणी होत होती. सरकारने अनुदान देत आता 35 रूपये प्रति लिटर भाव शेतकऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयामुळे काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला मात्र झटका लागला आहे. दुधापासून बनणारे पदार्थ आणि दुधाची भूकटी यामध्ये मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे होणारा खर्च आणि तोटा याचा ताळमेळ बसवण्यासाठी आता गोकुळने मोठा निर्णय घेतल्याचे अरूण डोंगरे यांनी सांगितले. राज्यातल अन्य दुध उत्पादक संघांनी दुधाच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे आता या सर्व गोष्टी लक्षात घेता गोकुळलाही दुधाच्या दरात वाढ करावी लागत आहे असेही ते म्हणाले.
गोकुळचे दुध मोठ्या प्रमाणात मुंबई आणि पुण्यात जाते. मोठ्या संख्येने गोकुळचे ग्राहक या दोन शहरात आहेत. मुंबईत रोज 3 लाख लिटर दुध गोकुळ मार्फत वितरीत केले जाते. तर पुण्यात जवळपास 40,000 हजार लिटर दुध वितरीत केले जाते. या सर्व ग्राहकांना आता याचा फटका बसणार आहे. मात्र हा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे गोकुळचे म्हणणे आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world