अमेरिकेत अर्थव्यवस्थेचा (Market Crash) विकास दर अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने जगभरातल्या बाजारात मंदीची लाट आली आहे. परिणामी भारतीय बाजारात राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी साधारण 300 अंक कोसळला. बीएसईचा सेन्सेक्स 80 हजाराच्या खाली ओपन झाला. बाँम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सवाला इंडेक्स 1200 अंकाच्या घसरणीसह 80 हजाराच्या खाली ओपन झाला. घसरणीसह ओपन झाला.
शेअर बाजार गेल्या काही दिवसात सातत्याने नव-नवे विक्रम प्रस्थापित करत आहेत. त्यामुळे एका टप्प्यात काही प्रमाणात नफा वसुली येणे स्वाभाविक आहे. पण या नफा वसुलीचे प्रमाण किती असेल आणि त्याचा वेग किती असेल याचा अंदाज लावणं कठीण आहे. त्यामुळे सामान्य गुंतवणुकदारांनी येत्या काही दिवसात बाजारापासून दोन हात दूर राहणे योग्य राहील असं जाणकारांचं मत आहे. अमेरिकेत अर्थव्यवस्थेचा विकास दर अपेक्षेपेक्षा (Share Market) कमी झाल्याने जगभरातल्या बाजारात मंदीची लाट आल्याचं म्हटलं जात आहे.
शेअर मार्केटमध्ये काय घडतंय? 'ब्लॅक मंडे' ?
अमेरिकेत मंदीची शक्यता निर्माण झाल्यानं अमेरिकन स्टॉक मार्केट कोसळलं आहे. अमेरिकेत स्टॉक मार्केट कोसळल्यामुळे त्याचा भारतीय बाजारावर थेट परिणाम पाहायला मिळत आहे. प्री ओपन सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून शेअर बाजार ओपन होताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही कोसळले आहे. बीएसईचा सेन्सेक्स 80 हजाराच्या खाली ओपन झाला. बाँम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सवाला इंडेक्स 1200 अंकाच्या घसरणीसह 80 हजाराच्या खाली ओपन झाला.
नक्की वाचा - ITR Filing: आयटी रिटर्न भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवा! CBDT ला पत्राद्वारे केली विनंती
NSE चा निफ्टी-50 सुद्धा 424 अंकाच्या घसरणीसह ओपन झाला. शुक्रवारी भारतीय बाजारात सुनामी आली, आज बाजार पहिल्या दहा मिनिटातच कोसळला. शुक्रवारी गुंतवणुकदारांनी शेअर बाजारात 4.56 लाख कोटी रुपये गमावले. अमेरिकेत उत्पादनचा जो डाटा आला आहे त्यानुसार, मंदीची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेत बेरोजगारांची रेकॉर्डब्रेक प्रमाणात वाढ झाली असून आयटी सेक्टरमध्ये मोठी नोकरकपात झाली आहे. टाटा, मारुती, जेएसडब्लू, एसबीआय, एम अँड एम, टायटन, रिलायन्सच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world