जाहिरात

IRCTC Tour: भाविकांसाठी खूशखबर! 'भारत गौरव' ट्रेनने करा उत्तर भारत दर्शन; वाचा प्रवासाचे वेळापत्रक आणि मार्ग

IRCTC Bharat Gaurav Train: भारतीय रेल्वे 25 एप्रिल ते 5 मे 2026 या कालावधीत दौंडहून 'महाकालेश्वर आणि उत्तर भारत दर्शन' विशेष ट्रेन चालवणार आहे. उज्जैन, मथुरा, हरिद्वार आणि वैष्णोदेवी यांसारख्या प्रमुख स्थळांचा यामध्ये समावेश आहे.

IRCTC Tour: भाविकांसाठी खूशखबर! 'भारत गौरव' ट्रेनने करा उत्तर भारत दर्शन; वाचा प्रवासाचे वेळापत्रक आणि मार्ग

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांसाठी भारतीय रेल्वेने एक आनंदाची बातमी आणली आहे. IRCTC द्वारे 'उत्तर भारत दर्शन' या विशेष दौऱ्यासाठी 'महाकालेश्वर आणि उत्तर भारत दर्शन यात्रा' या नावाखाली विशेष भारत गौरव ट्रेन चालवण्यात येणार आहे. 10 रात्री आणि 11 दिवसांच्या या प्रवासात भाविकांना उत्तर भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता येणार आहे.

भारतीय रेल्वे आणि IRCTC च्या वतीने 'देखो अपना देश' आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमांतर्गत उत्तर भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी विशेष भारत गौरव पर्यटक ट्रेन जाहीर करण्यात आली आहे. 25 एप्रिल 2026 पासून सुरू होणारी ही यात्रा 11 दिवसांची असून, भाविकांना अत्यंत कमी खर्चात आणि सोयीस्कररीत्या तीर्थयात्रा करण्याची संधी मिळणार आहे.

(नक्की वाचा-  Crime News: नाशिक हादरलं! विवाहितेचा 2 लाखांत 'सौदा'; इव्हेंटच्या नावाखाली नेलं अन् पुढे भयंकर घडलं)

प्रवासाचे वेळापत्रक आणि मार्ग

25 एप्रिल 2026 रोजी सकाळी  8 वाजता दौंड रेल्वे स्टेशनवरून हा प्रवास सुरू होईल. तर 5 मे 2026 रोजी रात्री 10.30 वाजता दौंड येथे परतणार आहे. यामध्ये उज्जैन (महाकालेश्वर), मथुरा, हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर (सुवर्ण मंदिर) आणि माता वैष्णोदेवी असा तीर्थक्षेत्रांचा प्रवास असणार आहे. 

बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग सुविधा

प्रवाशांच्या सोयीसाठी ही ट्रेन  दौंड, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा आणि उज्जैन या स्थानकांवर थांबेल जिथून प्रवासी चढू किंवा उतरू शकतात. 

(नक्की वाचा-  T20 World Cup: ...तर सामना न खेळताच भारत विश्वचषकातून बाहेर होणार? काय आहे ICC चा नियम?)

IRCTC पॅकेजमधील सोयी-सुविधा

राहण्याची सोय: प्रमुख धार्मिक केंद्रांवर प्रवाशांच्या निवासाची व्यवस्था.
भोजन: प्रवासादरम्यान आणि मुक्कामाच्या ठिकाणी शाकाहारी भोजनाची सोय.
दर्शन:  नियोजित वेळापत्रकानुसार तीर्थक्षेत्रांचे दर्शन आणि फिरण्यासाठी बसची व्यवस्था.
सुरक्षा:  प्रवासादरम्यान सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com