जाहिरात

Jalgaon News : रक्षा खडसेंसह जिल्हा विकास कामांची महत्त्वपूर्ण बैठक, अधिकारी मात्र नेटक्लिक्स अन् रील्स पाहण्यात व्यस्त

विकास कामांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करत असताना काही अधिकारी मात्र चक्क बैठकीत रील व व्हिडिओ पाहत असल्याचं दिसून आलं.

Jalgaon News : रक्षा खडसेंसह जिल्हा विकास कामांची महत्त्वपूर्ण बैठक, अधिकारी मात्र नेटक्लिक्स अन् रील्स पाहण्यात व्यस्त

मंगेश जोशी, प्रतिनिधी

जळगाव जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण बैठकीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांच्यासह जिल्ह्यातील खासदार-आमदार जिल्हाधिकारी व प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीय आयोजन केलं होतं. या बैठकीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील महामार्गासह विविध विकास कामांवरून मंत्री आक्रमक झालेल्या असताना काही अधिकारी चक्क मोबाइलध्ये व्हिडिओ व रील पाहत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ NDTV मराठीच्या हाती लागला आहे. जिल्ह्याच्या विकास कामावरून वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काही अधिकारी मोबाइलमध्ये व्हिडिओ आणि रील पाहत असल्याने अधिकाऱ्यांना आपल्या कर्तव्याचे किती गांभीर्य आहे, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

Dhas vs Mitkari: सुरेश धसांनी बजावले, तरी अमोल मिटकरी पुन्हा बोलले

नक्की वाचा - Dhas vs Mitkari: सुरेश धसांनी बजावले, तरी अमोल मिटकरी पुन्हा बोलले

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीची नुकतीच जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांच्यासह जिल्ह्यातील खासदार आमदार जिल्हाधिकारी व प्रशासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र या बैठकीत महामार्गाच्या प्रलंबित कामावरून मंत्री आक्रमक झालेले असताना काही अधिकारी मात्र चक्क मोबाइलमध्ये रील व व्हिडिओ बघण्यात व्यस्त असल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आला असून याबाबतचा व्हिडिओ हा एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागला आहे. 

Latest and Breaking News on NDTV

एकीकडे विविध योजना आणि विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. या संपूर्ण योजनांचा, विकास कामांचा विकास समन्वय व सह नियंत्रण बैठकीत आढावा घेण्यात येत होता. या विकास कामांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करत असताना काही अधिकारी मात्र चक्क बैठकीत रील व व्हिडिओ पाहत असल्याचं दिसून आलं. यातील एक जण तर नेटफ्लिक्सवरील स्क्विड गेम सीरिज पाहत असल्याचं दिसत आहे. आपल्या कर्तव्याचे अधिकाऱ्यांना किती गांभीर्य आहे याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर आता काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: