जाहिरात
Story ProgressBack

12 वी पास झाल्याचा आनंद, फिरण्यासाठी 'ती' उत्तर भारतात गेली, घात झाला

थोडं फिरून येऊन फ्रेश व्हावं असा प्लॅन 19 वर्षाच्या जानवी चव्हाणने केला होता. निकाल लागला चांगले गुण मिळाले. त्यामुळे तिच्या परिवारासह तिने उत्तर भारता फिरण्याचा प्लॅन बनवला. ते फिरायला गेलेही. पण पुढे तिच्याबरोबर जे झाले ते तिच्या संपुर्ण कुटुंबाला हादरवून सोडणारे होते.

Read Time: 2 mins
12 वी पास झाल्याचा आनंद, फिरण्यासाठी 'ती' उत्तर भारतात गेली, घात झाला
कोल्हापूर:

विशाल पुजारी

नुकताच 12 वीचा निकाल लागला. परिक्षा आणि त्यानंतर निकाल काय लागणार याच्या तणावात अनेक विद्यार्थी होती. पण निकाल लागला आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता पुढच्या वर्षाला प्रवेश घेण्याची गडबड. या सर्व गोष्टी पाहात थोडं फिरून येऊन फ्रेश व्हावं असा प्लॅन 19 वर्षाच्या जानवी चव्हाणने केला होता. निकाल लागला चांगले गुण मिळाले. त्यामुळे तिच्या परिवारासह तिने उत्तर भारता फिरण्याचा प्लॅन बनवला. ते फिरायला गेलेही. पण पुढे तिच्याबरोबर जे झाले ते तिच्या संपुर्ण कुटुंबाला हादरवून सोडणारे होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

जानवी प्रकाश चव्हाण ही तरूणी कोल्हापुरच्या फुलेवाडीची राहाणारी. नुकतीच तिने बारावीच्या परिक्षेत चांगले यश मिळवले. त्यानंतर तिने कुटुंबा बरोबर उत्तर भारतामध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता. त्यानुसार उत्तर भारतात ते सहलीला गेले. या सहलीत ते काशी, मथुरा, आयोध्या, उज्जैन या ठिकाणी ती देवदर्शन केले. मात्र या ठिकाणी प्रचंड उकाडा आहे. उष्णतेची लाट असल्याने त्याचा फटका जानवीला बसला. ती कुटुंबासमवेत उज्जेनमध्ये दर्शनसाठी गेले होते. तिथेच तिला उलटी आणि मळमळ सुरू झाली. तिला अशक्त पणा जाणवू लागला. जानवीला त्रास होत आहे हे लक्षात आल्यानंतर तिचे कुटुंबीयही घाबरले. त्यांनी आपली सहलमध्येच थांबवत कोल्हापुरकडे जाण्याचा निर्णय घेतला.  

हेही वाचा -  वांद्र्यामध्ये अभिनेत्री रवीना टंडनसोबत राडा, घटनेचा VIDEO VIRAL  

कोल्हापुरकडे परत येत असताना जानवीची तब्बेत आणखीनच बिघडली. शिर्डी पर्यंत ते पोहचले होते. त्रास जास्त होत असल्याने तिला शिर्डी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला हिट स्ट्रोक झाल्याचं कुटुंबीयांना सांगितलं. जानवीची प्रकृती बिघडत चाचली होती. जानवीचा 29 मे रोजी वाढदिवस होता. यामुळे जानवी आनंदात होती. मात्र वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी 30 मे रोजी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यामुळे ती थोडी तणावातही होती. उष्माघात झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. तिच्यावर उपचारही सुरू होते. पण त्यातच तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

हेही वाचा - भाजपच्या आमदाराला परिवारासह जीवे मारण्याची धमकी, नेमकं कारण काय?

महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाचा चढताच आहे. त्यामुळे सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन ही केले जात आहे. महाराष्ट्रात सुर्य आग ओकत असताना उत्तर भारतातही तिच स्थिती आहे. सर्वांना आता पावसाची प्रतिक्षा आहे. मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले आहे. आता तो महाराष्ट्रात कधी येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उष्णतेने हैराण झालेल्या लोकांना पाऊस आल्यानंतर निश्चितच दिलासा मिळणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
भाजपच्या आमदाराला परिवारासह जीवे मारण्याची धमकी, नेमकं कारण काय?
12 वी पास झाल्याचा आनंद, फिरण्यासाठी 'ती' उत्तर भारतात गेली, घात झाला
Murder of 1993 blast accused in Kalamba Jail, Kolhapur
Next Article
जेलमध्ये फुल टू राडा, 1993 स्फोटातील आरोपीला लोखंडी झाकणाने ठेचले
;