जाहिरात
This Article is From Jun 02, 2024

वांद्र्यामध्ये अभिनेत्री रवीना टंडनसोबत राडा, घटनेचा VIDEO VIRAL  

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनसोबत वांद्रे येथे राडा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वांद्र्यामध्ये अभिनेत्री रवीना टंडनसोबत राडा, घटनेचा VIDEO VIRAL  

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा (Raveena Tandon) एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एका वयोवृद्ध महिलेसह तिच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचा आरोप रवीना टंडन आणि तिच्या ड्रायव्हरवर करण्यात आला आहे. 

(नक्की वाचा: दंगल फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, सोशल मीडियावर शेअर केली भावुक पोस्ट)

मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याचा आरोप 

रवीना टंडनने मद्यधुंद अवस्थेत आईला मारहाण केल्याचा आरोप मोहम्मद नावाच्या व्यक्तीने केला आहे. शनिवारी (1 जून 2024) वांद्रे येथील रिझवी लॉ कॉलेज परिसरामध्ये ही घटना घडलीय. "रिझवी लॉ कॉलेजवळ माझ्या आईच्या अंगावर रवीना टंडनच्या ड्रायव्हरने गाडी घातली", असा आरोप मोहम्मदने केला आहे. याबाबत विचारणा केली असता रवीनाने आई आणि भाचीला मारहाण केल्याचा आरोपही त्याने केलाय.

(नक्की वाचा: 50 वर्षीय ऐश्वर्याचे ते फोटो पाहून चाहते घायाळ, 6 तासांत मिळाले लाखोंच्या संख्येनं लाइक्स)

मोहम्मदने आरोप केलाय की, "रवीना टंडन गाडीतून बाहेर आली आणि तिने आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळेस अभिनेत्री मद्यधुंद अवस्थेत होती. माझ्या आई आणि भाचीला इतकी मारहाण केली की त्यांच्या डोक्याला दुखापत झालीय". 

चाहत्यांनी उपस्थित केले प्रश्न 

घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी कित्येक प्रश्न उपस्थित केले आहेत. रवीना दारूच्या नशेत होती, यावरच काही युजर्संनी शंका उपस्थित केली आहे. एका युजरने म्हटले की, "ही लोकच रवीनावर हल्ला करत असल्यासारखे दिसत आहे. रवीना प्लीज-प्लीज म्हणतेय तर हे लोक मारा-मारा म्हणून ओरडताना दिसताहेत. यांचा एकतर्फी हेतू स्पष्टपणे दिसत आहेत". 

भुसावळमध्ये चाललंय काय? दुहेरी हत्याकांडानंतर आमदार सावकारेंना धमकीचा फोन

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com