Nashik Crime News : नाशिकमध्ये एका अल्पवयीन मुलाने आपल्या मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयावरून एका भिकाऱ्याची डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. या घटनेनंतर, एका अल्पवयीन मुलाने मृतदेहाजवळ डान्स केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नाशिक शहरातील त्र्यंबक नाका परिसरात ही घटना घडली. एका अल्पवयीन मुलाने आपल्या मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयावरून एका भिकाऱ्याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
(नक्की वाचा- इन्स्टाग्रामच्या फिल्टरने केला घात! 52 वर्षांची महिला पडली 26 वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात, अखेर भयंकर शेवट)
मिळालेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन मुलगा त्याच्या मैत्रिणीसोबत ठक्कर बजारजवळील एका हॉटेलजवळ उभा होता. त्यावेळी ती पाण्याची बाटली घेण्यासाठी गेली असता, तिथे बसलेल्या एका भिकाऱ्याने तिची छेड काढल्याचा संशय त्या मुलाला आला. यामुळे तो मुलगा रागाच्या भरात तेथून निघून गेला आणि त्याने भिकाऱ्याच्या डोक्यात दगड टाकला. या हल्ल्यात त्या अज्ञात भिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
(नक्की वाचा : इन्स्टाग्रामवरील ओळख ठरली जीवघेणी; टिटवाळ्याच्या तरुणीनं व्हिडिओ कॉल करत संपवलं आयुष्य )
घटनेनंतर, अल्पवयीन मुलाने केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप न झाल्यासारखे वागून, मृतदेहाजवळ डान्स केले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, अल्पवयीन मुलांच्या या गंभीर गुन्हेगारी प्रवृत्तीवर चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, पुढील कारवाई केली जात आहे.