जाहिरात

Kalyan News: कल्याणच्या 'मोडी भाई'ची पोलिसांनी जिरवली! बंदुक दाखवत दहशत माजवणं महागात पडलं

Kalyan News: कल्याण पश्चिमेतील रोहिदास वाडा परिसरात बंदूक दाखवून दहशत माजवणारा कुख्यात गुंड अभिषेक निंबोळकर उर्फ 'मोडी भाई' याला बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Kalyan News: कल्याणच्या 'मोडी भाई'ची पोलिसांनी जिरवली! बंदुक दाखवत दहशत माजवणं महागात पडलं

कल्याण पश्चिमेकडील रोहिदास वाडा आणि आसपासच्या परिसरात स्वतःला 'भाई' म्हणवून घेत नागरिकांमध्ये आणि तरुणांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या अभिषेक निंबोळकर उर्फ ‘मोडी भाई'ची पोलिसांनी चांगलीच जिरवली आहे. निंबोळकरच्या मुसक्या आवळण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. परिसरात आपली दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी अटकेनंतर या तथाकथित भाईची भररस्त्यातून परेड काढली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

“मी या परिसराचा भाई आहे...” 

काही दिवसांपूर्वी अभिषेक निंबोळकर याने रोहिदास वाडा परिसरात काही स्थानिक तरुणांना गाठून त्यांना थेट बंदुकीचा धाक दाखवला होता. "मी या परिसराचा भाई आहे, माझ्याबद्दल कोणीही काही बोलायचे नाही आणि माझ्या नादाला लागायचे नाही," अशी उघड धमकी त्याने दिली होती. या गुंडगिरीच्या आणि शस्त्राच्या वापरामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले होते. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.

(नक्की वाचा-  Pune Liquor Tragedy: विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, 9 पोलीस अधिकारी निलंबित, नावे आली समोर)

Kalyan News

बाजारपेठ पोलिसांची शोधमोहीम अन् ‘भाई' जेरबंद

या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम आणि सापळे रचले होते. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अभिषेक निंबोळकर उर्फ मोडी भाईला शिताफीने अटक केली.

(नक्की वाचा-  Nagpur News: गॅस सिलिंडरची कटकट संपणार? कचऱ्यापासून तयार होणार 'बायोगॅस', नागपुरात देशातील पहिला प्रकल्प सज्ज)

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, अभिषेकचा इतर काही गुन्हेगारी कृत्यांमध्ये किंवा टोळ्यांमध्ये सहभाग आहे का, याचा कसून तपास केला जात आहे. त्याच्याकडे असलेल्या शस्त्राबाबतही पोलीस अधिक चौकशी करत आहेत. पोलिसांचा धाक राहावा म्हणून त्याची भरचौकातून परेड काढण्यात आली. नागरिकांकडून पोलिसांच्या या कृत्याचं स्वागत होत आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com