Kalyan News : मुरबाड - कल्याण मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो दैनंदिन प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. परिवहन विभागाकडून मुरबाड बस आगाराला अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या १० नवीन बस सुपूर्द करण्यात आल्या आहेत. मुरबाड बस आगारात 5 आणि कल्याण आगारात 5 बस दाखल झाल्या आहेत. 5 बस या कल्याण-मुरबाड तर 5 बस या मुरबाड-कल्याण अशा धावणार आहेत.
मुरबाड-कल्याण मार्गावर १० नवीन बस...
या नवीन बसचा भव्य लोकार्पण सोहळा मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या लोकार्पण सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व १० नवीन बस इतर कोणत्याही मार्गावर न पाठवता, केवळ मुरबाड - कल्याण याच मुख्य मार्गावर चालवल्या जाणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर प्रवाशांची होणारी गर्दी आणि अपुऱ्या बसेसची समस्या लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन १० बस ताफ्यात सामील झाल्यामुळे मुरबाड-कल्याण मार्गावरील बसच्या दैनंदिन फेऱ्यांमध्ये तब्बल ३० अतिरिक्त फेऱ्यांची वाढ होणार आहे. यामुळे या मार्गाची एकूण प्रवासी वाहतूक क्षमता सुमारे ३० ते ३५ टक्क्यांनी वाढणार आहे. परिणामी, नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थी वर्गाला बससाठी जास्त वेळ ताटकळत उभं राहावं लागणार नाही आणि त्यांचा प्रवास अधिक सुकर होईल.
मुरबाड-कल्याण मार्गावरील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या नवीन १० अत्याधुनिक बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास सुखाचा होईल आणि फेऱ्या वाढल्याने प्रवाशांचा वेळही वाचेल. तसेच नव्हेंबर महिन्यापर्यंत मुरबाड बस डेपोच नूतनीकरणाच काम ही पूर्ण होणार असल्याचं स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world