जाहिरात

Kalyan News : कोर्टात वकील बनून न्यायासाठी अन् बाहेर देहाचा सौदा; कल्याणमधील नामांकित महिलेचं संतापजनक कृत्य

ठाणे मानव तस्करी विरोधी कक्षाने कारवाई करत कथित सेक्स रॅकेट प्रकरणात एका महिला वकिलाला अटक केली आहे.

Kalyan News : कोर्टात वकील बनून न्यायासाठी अन् बाहेर देहाचा सौदा; कल्याणमधील नामांकित महिलेचं संतापजनक कृत्य

Kalyan News : कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे मानव तस्करी विरोधी कक्षाने कारवाई करत कथित सेक्स रॅकेट प्रकरणात एका महिला वकिलाला अटक केली आहे. यामध्ये दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या महिलेने वकिलाच्या वेशात किती महिलांना आणि तरुण मुलींना या व्यवसायात ओढलं आहे याचा तपास पोलिसांकडून केला जात आहेत.

वकील बनून देहव्यापाराचा व्यवसाय...

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरातील एका नामांकित उडपी हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना एका महिलेकडून कल्याणमध्ये देहव्यापार चालवला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ग्राहक बनून सापळा रचला. यावेळी संबंधित महिला दोन तरुणींना घेऊन उडपी पॅलेस हॉटेलमध्ये आली असता पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं.

नक्की वाचा - Mumbai News : मोहरमच्या जुलूसमधील 30 हजार जणांना संपवण्याचा प्लान? कॅप्सूलबाबत उपायुक्तांची धक्कादायक माहिती

पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव मनीषा नांदे असून ती कल्याण आणि पनवेल परिसरात वकिली व्यवसाय करते. या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात हॉटेल चालकाची भूमिका काय आहे, हॉटेलमध्ये हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता, तसेच या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा तपास पोलिसांकडून केला जात आहेत. या प्रकरणाचा तपास कोळशेवाडी पोलीस करीत आहेत. दरम्यान, या कारवाईनंतर कल्याणमधील एका नामांकित हॉटेलमध्ये अशा प्रकारचे प्रकार सुरू होते का, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस तपासातून लवकर ही माहिती समोर येईल.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com