
अमजद खान
Kalyan News: कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्डे पडून रस्त्यांची पूरती वाट लागली आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे नागरीक आणि वाहन चालक हैराण आहेत. रस्त्यावरील खड्डयांवरुन नागरीकांचा संताप अनावर होत असताना कल्याण पूर्वेतील एका इमारतीच्या समोर चिखलाची वाट आहे. त्याठिकाणी रस्ताच नाही. या चिखलाच्या वाटेमुळे एका आजीबाईच्या पार्थिवाला तिच्या नातेवाईकांना खांदा देता आला नाही. अखेरीस शववाहिनीतून आजीबाईचे पार्थिव स्मशानात नेण्याची वेळ तिच्या नातेवाईकावर आली. इमारतीतील नागरीकांसह आजीबाईच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. इमारतीसमोरील रस्ता महापालिका कधी करणार आहे असा सवाल उपस्थित केला आहे.
इमारती समोर रस्ताच नाही
कल्याण पूर्वेतील जाईबाई शाळेच्या नजीक ओम श्री सुदर्शन इमारत आहे. या इमारतीच्या समोरुन जाणारा रस्ता मुख्य रस्त्याला मिळतो. या इमारतीसमोरचा रस्ता तयार करण्यात आलेला नाही. हा रस्ता कच्चा असल्याने तो मातीचा आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पूर्ण चिखल झाला आहे. या चिखलातूनच इमारतीमधील रहिवासी ये जा करतात. या चिखलमय रस्त्याने नागरीक त्रस्त असताना आज इमारतीमधील रहिवासी दीपक लोखंडे यांच्या आई विमल लोखंडे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर स्मशानभूमीत पार्थिक नेण्यापूर्वी घरासमोर विधी केला जातो.
नक्की वाचा - Kalyan News: थेट धमकी! 'मुलांचे भविष्य वाया घालवू नका, आता समज देतोय नाही तर...'
चिखलात करावा लागला विधी
त्याठिकाणी जागा नसल्याने त्यांना रस्त्यावर विधी करावा लागला. रस्त्यावर चिखल असल्याने त्यांच्यावर चिखलात लाकडी फळ्या टाकून विधी करण्याची वेळ आली. कसा बसा विधी आटोपला. मात्र आजीबाईचे पार्थिक तिरडीवरुन घेऊन जाणे शक्य नव्हते. समोर चिखलाचा रस्ता असल्याने त्याठिकाणी आजीबाईच्या नातेवाईकांना शववाहिनीतून पार्थिव स्मशानात घेऊन जावे लागले. रस्त्यावरील चिखलामुळे आजीबाईच्या पार्थिवास नातेवाईकांना खांदा देता आला नाही. या घटनेचा इमारतीमधील नागरीक आणि आजीबाईच्या नातेवाईकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
रस्ता कधी करणार?
याठीकाणी रस्ता व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सचिन आळंगे यांनी सांगितले, इमारतीसमोरचा रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्ता तयार करण्यात आलेला नाही. केडीएमसी, स्थानिक आमदार खासदारांनी याठिकाणी सिमेंटचा रस्ता तयार करावा. त्याठिकाणी रहिवासी राहतात. विद्यार्थी क्लासला जातात. दुचाकी चालकांची दुचाकी घसरुन अपघात होत आहे. आज तर कहरच झाला. आजीबाईच्या पार्थिवाकरीता त्यांच्या नातेवाईकांना धड विधीही करता आला नााही. चिखलाच्या रस्त्यात लाकडी फळ्या टाकून विधी उरकावा लागला. ही किती योग्य आहे असा प्रश्न त्यांनी महापालिका प्रशासनाला केला आहे. शिवाय संताप ही व्यक्त केला आहे.
नक्की वाचा - Kalyan News: स्मार्ट मीटरने दिला वीज बील वाढीचा शॉक, भरमसाठ रकमेमुळे सर्वच हैराण
महापालिका लक्ष देणार का?
तसेच पार्थिवाला खांदा देता आला नाही. ही अत्यंत दुख देणारी बाब आहे. आता तरी महापालिकेने आमच्या मागणीची दखल घेऊन रस्ता तयार करावा, अन्यथा आम्हाला महापालिकेच्या विरोधात आंदोलन करावे लागेल. इमारतीचे माजी सेक्रेटरी सुजित श्रीवास्तव यांनी सांगितले की, आज इमरातीमध्ये एका आजीबाईंचे निधन झाले. त्यांचे पार्थिक ठेवण्यासाठी जागा नव्हती. चिखलात लाकडी फळ्या टाकून त्याठिकाणी विधी करावा लागला. चिखलातून अंत्ययात्रा जाऊ शकत नव्हती. शववाहिनी आणावी लागली. आमची समस्या महापालिकेने आता तरी सोडवावी असं ते म्हणाले. त्यामुळे महापालिका याकडे किती लक्ष देते हे पहावे लागणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world