जाहिरात

Kalyan News:आधी आई-बाळ स्थिर, मग अचानक काय घडलं? KDMC च्या हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार

Kalyan News: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचा एक अतिशय संतापजनक आणि मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे

Kalyan News:आधी आई-बाळ स्थिर, मग अचानक काय घडलं? KDMC च्या हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार
Kalyan News: महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अशी जीवघेणी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही.
कल्याण:

Kalyan News: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचा एक अतिशय संतापजनक आणि मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या रुग्णालयात वेळेवर आणि योग्य उपचार न मिळाल्यामुळे एका नवजात निष्पाप बाळाला आपला जीव गमवावा लागला आहे. प्रसूतीनंतर झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे केडीएमसीच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून, संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकांनी या निष्काळजीपणासाठी थेट पालिका प्रशासनाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची आक्रमक मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

कल्याण पूर्वेतील सक्तीधाम हॉस्पिटलमध्ये साक्षी तिवारी या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. तिच्यावर तिथे उपचार सुरू होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसूती होण्यापूर्वी आई आणि पोटात असलेले बाळ या दोघांचीही प्रकृती पूर्णपणे उत्तम आणि स्थिर होती. डॉक्टरांनीही कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले होते. मात्र, प्रसूती झाल्यानंतर अचानक बाळाची तब्येत खालावली आणि काही वेळातच त्या नवजात बाळाचा मृत्यू झाला.

बाळाच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांचा सुन्न झाले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांसह शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन निकम यांनी तातडीने रुग्णालय गाठून प्रशासनाला जाब विचारला. 

( नक्की वाचा : Kalyan News: चेन स्नेचिंग करणाऱ्या कल्याणच्या इराणी टोळ्या आता ड्रग्स धंद्यात; महिलांचाही सहभाग वाढल्याने खळबळ )

रुग्णालयात अत्यंत आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधा आणि योग्य उपचार वेळेत उपलब्ध नसल्यामुळेच बाळाचा जीव गेल्याचा थेट आरोप नातेवाईकांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, रुग्णालयातीलच काही डॉक्टरांनी औषधांचा तुटवडा आणि अपुऱ्या सुविधांबद्दल स्वतः माहिती दिल्याचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी उघड केले आहे.

 हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अशी जीवघेणी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही असे प्रकार समोर आले आहेत. प्रशासनाचा हा हलगर्जीपणा नसून थेट निष्पाप जीवाचा बळी घेण्याचा प्रकार आहे, असा आरोप महेश गायकवाड यांनी केला आहे. यामुळे महापालिका प्रशासनातील संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि रुग्णालय व्यवस्थापनावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, तसेच केडीएमसी प्रशासनाविरोधात थेट हत्येचा गुन्हा नोंदवण्यात यावा अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे. 

( नक्की वाचा : Akola News : अक्षय कुमारची स्टाईल वापरून 25 लाखांची लूट; पण अकोला पोलिसांनी 12 तासांमध्येच केला गेम ओव्हर )

आता या संवेदनशील प्रकरणावर पालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासन काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण कल्याणकरांचे लक्ष लागले आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com