अमजद खान, प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा ठाणे जिल्हा हा बालेकिल्ला मानला जातो. लोकसभा निवडणुकीत राज्यात इतरत्र महायुतीची पडझड झाली. पण, ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचा गड आपल्या ताब्यात ठेवण्यात मुख्यमंत्री शिंदे यशस्वी झाले. कल्याणमध्ये तर सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत. शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे यांचा शब्द अंतिम असतो. त्याचवेळी शिंदे यांच्या आदेशाला कल्याणमध्ये शिवसेनेकडूनच विरोध झालाय. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कल्याणमध्ये महापालिकेने कॉलेज परिसरातील अनधिकृत टपऱ्यावर कारवाई सुरु केली. या कारवाईला मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या महिला जिल्हा प्रमुखांनी विरोध केल्याने एकच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे अधिकारी देखील संभ्रमात आहेl. एकीकडे मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश आणि दुसरीकडे शिवसेना नेत्यांचा विरोधात असल्याने पोलिस आणि महापालिका प्रशासनाने करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुण्यात पब आणि हुक्का पार्लर घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यात शाळा कॉलेज परिसरातील अवैध रित्या सुरु असलेल्या ढाबे आणि टपऱ्या विरोधात कारवाईचे आदेश दिले संबंधित प्रशासनाला दिले आहेत. या आदेशानंतर ठिकठिकाणी कारवाई सुरु देखील झाली आहे. कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरात महापालिकेने कारवाई सुरु केली. कॉलेजच्या रस्त्यांजवळच्या टपऱ्यांवर जेसीबीनं पाडण्याचं काम सुरु केलं.
Exclusive : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं नाही, भाजपाच्या बड्या नेत्यानं सांगितला प्लॅन
या कारवाईला सुरुवातीला दुकानदारांनी विरोध केला. त्यातचं या दुकानदारांना शिवसेना महिला जिल्हा प्रमुख छाया वाघमारे यांनी पाठींबा देत कारवाईला विरोध केला आहे. या टपऱ्या अनधिकृत असल्याने महापालिकेने ही कारवाई सुरु केली आहे. मात्र छाया वाघमारे यांचा वेगळा दावा आहे.
'प्रत्येक वेळी कारवाई होते, तेंव्हा बिर्ला कॉलेजच्या गेटवरील दुकानावर कारवाई केली जाते. हे स्टॉल्स गेल्या ३० वर्षापासून आहेत. हे विद्यार्थ्याकरीता आहेत. त्याठिकाणी चहा पेन वही विकले जाते. या स्टॉल्स वरून अंमली पदार्थ विकले जात नाहीत. या स्टॉल धारकांचे पोट हातावर आहे. महापालिकेने त्यांना लायसन्स द्यावे. त्यांना ठाणे मुंबईच्या धर्तीवर स्मार्ट स्टॉल्स द्यावेत,' अशी मागणी त्यांनी केली आहे.
( नक्की वाचा : अहमदनगरच्या आयुक्तांचं घर ACB कडून सील! आयुक्त जावळे फरार )
KDMC आयुक्तांचा इशारा
कल्याण डोंबिवली महापालिका कारवाईला ठाम आहे. कोणतेही अवैध धंदे करु द्यायचे नाहीत, असे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत. त्या संदर्भातील आदेश महापालिका, पोलिस आणि उत्पादन शुल्क अधिकारी वर्गास दिले आहे. कारवाई कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही, असा इशारा केडीएमसी आयुक्त इंदूराणी जाखड यांनी दिला आहे.