जाहिरात

'मी धनंजय मुंडे स्वीकार करतो की...' करुणा शर्मा यांनी सादर केला लग्नाचा सर्वात मोठा पुरावा

Karuna Sharma vs Dhananjay Munde Case : माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वादावर मुंबईच्या माझगाव कोर्टात सुनावणी झाली.

'मी धनंजय मुंडे स्वीकार करतो की...' करुणा शर्मा यांनी सादर केला लग्नाचा सर्वात मोठा पुरावा
मुंबई:

Karuna Sharma vs Dhananjay Munde Case : माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वादावर मुंबईच्या माझगाव कोर्टात सुनावणी झाली.  आपण धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहोत. आपल्याला त्यांच्याकडून पोटगी मिळाली पाहिजे असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. मुंबई सत्र न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. या सुनावणीच्या दरम्यान करुणा मुंडे यांनी आपण पहिली पत्नी असल्याचा दावा केला. त्याचबरोबर याबाबतचे पुरावे देखील सादर केले. धनंजय मुंडे यांच्या वकिलाने हे पुरावे नाकारले, पण माझगाव कोर्टानं त्यांची याचिका फेटाळली. करुणा मुंडे यांना महिना दोन लाख रुपये पोटगी देण्याचा कौटुंबीक न्यायालयाचा निर्णय माझगाव कोर्टानं कायम ठेवलाय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

करुणा मुंडे यांनी कोर्टात धनंजय मुंडे यांचं नाव मृत्यूपत्र सादर केलं. त्यामध्ये करुणा मुंडे यांच्या नावासमोर पहिली पत्नी तर राजश्री मुंडे यांच्या नावासमोर दुसरी पत्नी असा उल्लेख आहे, असा दावा त्यांनी केला.

धनंजय मुंडे यांनी त्यावेळी आपल्याला पहिल्या पत्नीचा दर्जा दिल्याचा करुणा मुंडे यांनी दावा केला. त्याचबरोबर आम्ही 27 वर्ष सोबत राहिलो आहोत असंही त्यांनी कोर्टात सांगितलं. आमचं जॉईंट बँक अकाऊंट आहे. पॉलिसी आहे. परळी पोलिस ठाण्यात माझ्या लग्नाचे पुरावे देखील आहेत, असं करुणा यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर त्यांनी यावेळी कोर्टात धनंजय मुंडे यांनी त्यांचा पत्नी असल्याचं स्विकृतीपत्रक देखील सादर केलं.

( नक्की वाचा : Manikrao Kokate : कर्जमाफीमध्ये मिळालेल्या पैशांचं काय करता? कृषीमंत्र्यांचा शेतकऱ्यांना उलटा प्रश्न )

काय आहे स्विकृतीपत्रक?

करुणा मुंडे यांनी सादर केलेल्या स्विकृतीपत्रकात धनंजय मुंडे यांनी त्यांचं करुणा यांच्याशी लग्न झाल्याचा उल्लेख आहे. धनंजय पंडितराव मुंडे आणि करुणा अशोक शर्मा यांचं 9 जानेवारी 1988 रोजी वैदीक पद्धतीनं लग्न झालं आहे, असं या पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.

मी आई-वडिलांच्या दबावात दुसरं लग्न केलं तरी करुणाला घटस्फोट देणार नाही. तसंच माझे मुलं सिशव आणि शिवानी तसंच करुणासोबत राहणार असल्याचं या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

Latest and Breaking News on NDTV

धनंजय मुंडेंनी फेटाळला दावा

दरम्यान धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनीही कोर्टात युक्तीवाद केला. त्यावेळी त्यांनी करुणा मुंडे यांनी खोटी कागदपत्रक सादर केल्याचा दावा केला. मृत्यूपत्रकातील गोष्टी खोट्या नमूद करण्यात आले आहेत. त्यासंदर्भात करुणा मुंडे यांची यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आले आहे, असा दावा सावंत यांनी केला. त्यांनी खोटी कागदपत्रं तयार केली आहेत. आम्ही ते नाकारात आहोत, असं सावंत यांनी सांगितलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: