
प्रांजल कुलकर्णी, प्रतिनिधी
Manikrao Kokate on Farmer Loan : देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर तीन महिने उलटली आहे. त्यानंतरही महायुतीनं विधानसभा निवडणुकीत दिलेल्या काही आश्वासनांची पूर्तता कधी होणार? हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना कधी मिळणार? याबाबतही सर्वांना उत्सुकता आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे याबाबतचा संभ्रम वाढला होता. आता त्यानंतर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी याबाबत शेतकऱ्यांनाच धक्कादाक प्रश्न विचारला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कृषीमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यापासूनच कोकाटे वेगवेगळ्या वादात सापडले आहेत. आता त्यांच्या ताज्या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे. कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे तुम्ही काय करता ? शेतीमध्ये एक रुपयाही तरी गुंतवणूक करता का ? असा प्रश्न कोकाटे यांनी विचारला आहे. नाशिकच्या माडसांगवी गावात शुक्रवारी (4 एप्रिल) कृषीमंत्र्यांनी नुकसाण पाहणी दौरा केला, त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनाच हा प्रश्न विचारला.
5 ते 10 वर्ष वाट बघता तोपर्यंत कर्ज भरतचं नाही. विम्याचे पैसे द्या म्हणतात आणि पैसे आले की साखरपुडे कर, लग्न कर, असं करता असं कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्याला सुनावले. सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीसाठी शेतकऱ्याना पैसे देणार असल्याचे आश्वासन कोकाटे यांनी दिले.
( नक्की वाचा : Farmer Loan : शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहिरनाम्यातच? राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्टीकरण... )
कोकाटेंची वादग्रस्त कारकिर्द
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे वादात साडण्याचं हे पहिलंच उदाहरण नाही. सरकारची फसवणूक करत मुख्यमंत्र्यांच्या 10 टक्के कोट्यातील 4 सदनिका बळकवल्याचा माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधुंवर आरोप प्रकरणात नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती.
त्यामुळे कोकाटेंचं राजकीय भवितव्य धोक्यात सापडलं होतं. अखेर कोकाटेंना नाशिक सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या शिक्षेला जिल्हा आणि सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणात कोकाटेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. हे प्रकरण शांत होण्यापूर्वीच त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world