जाहिरात

1947 चा खटला अखेर 79 वर्षांची निकाली, मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासातील सर्वात जुनं प्रकरणं कोणतं होतं?

Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.

1947 चा खटला अखेर 79 वर्षांची निकाली, मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासातील सर्वात जुनं प्रकरणं कोणतं होतं?

Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. स्वातंत्र्यानंतरचा म्हणजेच 7 ऑक्टोबर 1947 रोजी दाखल झालेला एक दिवाणी दावा तब्बल 79 वर्षांनंतर निकाली काढण्यात आला आहे. न्यायमूर्ती फरहान पी. दुबाश यांनी 5 फेब्रुवारी 2026 रोजी या प्रकरणावर अंतिम मोहोर उमटवली. हा खटला दिवंगत हाजी अली मोहम्मद हाजी कासम अगबोटवाला यांच्या मालमत्तेच्या वाटपाशी संबंधित होता. या इस्टेटमध्ये मुंबईतील संपूर्ण दहिसर गावाचा समावेश असून एकूण क्षेत्रफळ सुमारे 2,891 एकर इतके होते.

सर्वाधिक कालावधीकरिता प्रलंबित प्रकरणाचा निकाल...

मालमत्तेची देखभाल करण्यासाठी न्यायालयाने 1950 मध्ये 'कोर्ट रिसीव्हर'ची नियुक्ती केली. तसेच 1952 मध्ये न्यायालयाने प्राथमिक हुकूमनामा जारी करून सर्व वारसांचे कायदेशीर वाटे निश्चित केले. गेल्या आठ दशकांत मूळ पक्षकारांचे निधन झाले आणि त्यांचे वारस न्यायालयात लढा देत राहिले. आज या खटल्यात मृताची चौथी पिढी कार्यरत होती.

नक्की वाचा - Mumbai Musical Road : देशातील पहिला प्रयोग, कोस्टल रोडवरील गाण्याला रहिवासी वैतागले; मुख्यमंत्र्यांकडे धाव

प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर, चौथ्या पिढीतील सर्व वारसांनी एकत्र येत 'परस्पर संमतीने अटी' मान्य केल्या. न्यायालयाने या अटी स्वीकारून हा दावा निकाली काढला. या निकालामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासातील सर्वात जास्त कालावधीकरिता प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी एकाचा निकाल लागला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com