Nagpur Violence : नागपुरात दंगलीचा 'काश्मीर पॅटर्न', ATS करणार चौकशी

Nagpur Violence : हिंसाचाराच्या वेळी पेट्रोल बॉम्बचा वापर करण्यात आला. हा हल्ला सुनयोजित असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रविण मुधोळकर, नागपूर

Nagpur Violence Update: नागपुरातील हिंसाचार प्रकरणातील आरोपींविरोधात कारवाईचा फास आवळणार आहे. नागपूर पोलिसांसोबतच दहशतवाद विरोधी पथकाने नागपूरात झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने असामाजिक तत्व काही वर्षांपूर्वी दगडफेक करायचे, तशाच प्रकारची दगडफेक नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी झाली होती. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) तपासात सामील होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर ही घटना घडली होती. सोमवारी संध्याकाळी हिंसाचार उसळलेल्या हिसांचारातील ‘काश्मीर पॅटर्न' दगडफेकीची महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) समांतर चौकशी सुरू केली आहे.

(नक्की वाचा-  Nagpur Violence: संतापजनक! नागपूरमध्ये हिंसक जमावाने घेरलं अन्... महिला पोलिसांसोबत काय घडलं?)

महाल परिसरातल्या हिंसाचाराची घटना ही एका सुनियोजित  कटाचा भाग होता, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जर हा एका सुनियोजित कटाचा भाग असेल तर या कटासाठी कुठल्या दहशतवादी संघटनेने पैशाची उपलब्धता केली आहे का? याचाही तपास एटीएस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा करणार आहे.

(नक्की वाचा - Nagpur Violence : नागपूर दंगल रोखता आली असती का? पोलिसांचं नेमकं काय चुकलं?)

हिंसाचाराच्या वेळी पेट्रोल बॉम्बचा वापर करण्यात आला. हा हल्ला सुनयोजित असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केलं होतं. या प्रकरणात कुणी आर्थिक सहाय्य केले आहे का याचा सुद्धा तपास नागपूर पोलीस आणि दहशतवादी विरोधी पथक करणार आहे.

Advertisement

पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या वाहनांवर पेट्रोल बॉम्ब फेकले गेले, ही बाब चिंताजनक आहे. हे बॉम्ब कसे वापरले गेले याची चौकशी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. दंगेखोरांना कुणाचा पाठबळ होतं का? याची देखील चौकशी पोलीस करणार आहेत. 

Topics mentioned in this article