KDMC Election 2026: कल्याण-डोंबिवलीत भाजपने खातं उघडलं, निवडणुकीआधीच 2 उमेदवार विजयी

KDMC Election 2026: कल्याण-डोंबिवलीत यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे, मात्र समीकरणे बदलली आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण 122 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

KDMC Election 2026: राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याआधीच कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये डोंबिवलीतील आसावरी केदार नवरे आणि कल्याणमधील रेखा चौधरी यांचा समावेश आहे.

कशी झाली बिनविरोध निवड?

आसावरी केदार नवरे यांनी पॅनल क्रमांक 26 (क) मधून खुल्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. तर रेखा चौधरी यांनी पॅनल क्रमांक 18 (अ) मधून बिनविरोध विजय मिळवला आहे.

(नक्की वाचा-  Pune Election: 'माझा फॉर्म मला परत द्या', शिवसेनेच्या महिला उमेदवाराचा 'एबी फॉर्म' चोरीला? रडू कोसळलं)

केडीएमसी निवडणुकीचे नवीन समीकरण

कल्याण-डोंबिवलीत यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे, मात्र समीकरणे बदलली आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण 122 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

महायुती (भाजप + शिवसेना शिंदे गट)

  • शिवसेना (शिंदे गट)- 66 जागांवर लढणार
  • भाजप- 56 जागांवर लढणार
  • (अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडला असून ते 42 जागांवर स्वतंत्र लढणार आहेत)

मनसे + शिवसेना (ठाकरे गट)  एकत्र

  • मनसे- 54 जागांवर निवडणूक लढवणार.
  • शिवसेना (ठाकरे गट) - 68 जागांवर आपले नशीब आजमावणार आहेत.

(नक्की वाचा- Navi Mumbai: AB फॉर्म मिळाले, सगळी तयारीही केली, मात्र अखेरच्या क्षणी ट्विस्ट; भाजपच्या 13 उमेदवारांची फसवणूक?)

बंडखोरीचे आव्हान

जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी, दोन्ही गटांसमोर बंडखोर उमेदवारांना शांत करण्याचे मोठे आव्हान आहे. महायुतीतून अजित पवार गट बाहेर पडल्याने मतांचे विभाजन कोणाच्या फायद्याचे ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Topics mentioned in this article