जाहिरात

Konkan Railway : कोकण रेल्वेचे गणेशोत्सव आरक्षण 'या' तारखेपासून सुरू; चेक करा महत्त्वाच्या तारखा

Konkan Railway Ganesh Utsav Train : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावरील 'कोकणकन्या एक्सप्रेस'सह इतर नियमित गाड्यांचे आगाऊ तिकीट आरक्षण 13 जुलैपासून सुरू होत आहे.

Konkan Railway : कोकण रेल्वेचे गणेशोत्सव आरक्षण 'या' तारखेपासून सुरू; चेक करा महत्त्वाच्या तारखा

गणेशोत्सव संपूर्ण कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि सर्वात मोठा सण मानला जातो. दरवर्षी लाखो चाकरमानी बाप्पाच्या आणि गौरीच्या उत्सवासाठी मुंबई-पुण्यातून न चुकता आपल्या कुटुंबासह गावी जातात. याच पार्श्वभूमीवर, जर तुम्हाला यंदा प्रवासादरम्यान स्पेशल गाड्यांच्या लेट-लतीफ कारभारापासून वाचायचे असेल आणि हक्काच्या नियमित गाड्यांमधून प्रवास करायचा असेल, तर आतापासूनच सज्ज व्हा. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आगाऊ तिकीट आरक्षण 13 जुलैपासून अधिकृतपणे खुले होत आहे.

विशेष गाड्यांऐवजी नियमित गाड्यांना पसंती

दरवर्षी रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या सोडल्या जातात. या गाड्या मुंबईतून वेळेत सुटत असल्या, तरी कोकणात वेळेत पोहोचतील याची कोणतीही शाश्वती नसते. अनेकदा या गाड्या तासनतास रखडतात. त्यामुळे चाकरमान्यांची पहिली पसंती नेहमी 'कोकणकन्या', 'मांडवी', 'तुतारी' किंवा 'मत्स्यगंधा' सारख्या नियमित गाड्यांना असते. या गाड्यांचे तिकीट मिळवण्यासाठी दरवर्षी मोठी चुरस पाहायला मिळते. यंदा 14 सप्टेंबर 2026 रोजी गणेश चतुर्थी आहे. श्रावणी अमावस्या संपल्यानंतर चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे निघतात.

(नक्की वाचा-  Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)

महत्त्वाच्या तारखा 

  • 11 सप्टेंबरच्या प्रवासासाठी (शुक्रवार रात्री): श्रावणी अमावस्या 11 सप्टेंबरला सकाळी 8:56 वाजता संपत आहे. त्यामुळे अनेकजण याच रात्री निघणार आहेत. या दिवसाचे आरक्षण 13 जुलै रोजी सुरू होईल.
  • 12 आणि 13 सप्टेंबरच्या प्रवासासाठी (शनिवार-रविवार): शनिवार आणि रविवारच्या नियमित गाड्यांचे आरक्षण अनुक्रमे 14 जुलै आणि 15 जुलै रोजी होणार आहे.
  • 17 सप्टेंबरच्या प्रवासासाठी (गौरी आगमन विशेष): यंदा 17 सप्टेंबरला गौरी आगमन असून 18 सप्टेंबरला मुख्य गौरीपूजन आहे. त्यामुळे गौरीच्या ओवशासाठी जाणाऱ्यांची गर्दी प्रचंड असते. 17 सप्टेंबर रोजी गावी पोहोचण्यासाठीचे महत्त्वाचे आरक्षण 19 जुलै रोजी सुरू होईल.

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar: पैशांपुढे नातं हरलं! मुलाने भररस्त्यात वडिलांना चाकूने वार करून संपवलं

कोकण रेल्वेच्या आयआरसीटीसी (IRCTC) प्रणालीनुसार 120 दिवस आधी तिकीट आरक्षण करता येते. त्यामुळे ऐनवेळी होणारी झुंबड आणि वेटिंग लिस्टचा मनस्ताप टाळण्यासाठी कोकणवासीयांनी या जुलै महिन्यातील आरक्षणाच्या तारखा आठवणीत ठेवणे गरजेचे आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com