जाहिरात

Konkan Railway : कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी सुरू केलेली खास सेवा वर्षभरात बंद, कारण काय?

भविष्यात मागणी वाढल्यानंतर ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

Konkan Railway : कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी सुरू केलेली खास सेवा वर्षभरात बंद, कारण काय?

Konkan Railway : यंदाच्या वर्षी गणेशोत्सवदरम्यान कोकण रेल्वेकडून खासगी वाहनांसाठी रोल ऑन रोल ऑफ म्हणजेच रो-रो सेवा चालविणार नसल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी प्रवाशांकडून कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर रेल्वेने सध्या तरीही ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेसाठी २० हून कमी वाहनांची बुकिंग झालं होतं, त्यामुळे भविष्यात मागणी वाढल्यानंतर ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

रो-रो सेवा कधीपासून झाली सुरू?

खासगी वाहनांसाठी ही विशेष रो-रो सेवा २३ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू करण्यात आली होती. याअंतर्गत प्रवासी आपलं खासगी वाहन ट्रेनच्या माध्यमातून कोकणात पाठवू शकत होते आणि स्वत: वेगळा प्रवास करू शकत होते. मात्र प्रवाशांना ही सुविधा फारशी रुचली नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी कोकण रेल्वेने गणेशोत्सवादरम्यान अधिक विशेष ट्रेन चालविण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. 

नक्की वाचा - Matheran News : 15 जूनपासून नेरळ-अमन लॉजदरम्यान टॉय ट्रेन बंद; पर्यटकांसाठी काय असेल पर्याय? पाहा शेड्यूल


४०० विशेष ट्रेन धावणार...

गेल्या वर्षी रेल्वेने ३८२ गणपती स्पेशल ट्रेन चालवल्या होत्या. यावर्षी तब्बल ४०० विशेष ट्रेन चालविण्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे. अतिरिक्त विशेष ट्रेनमुळे अधिक प्रवाशांना फायदा होईल. जागा वाढतील आणि वेटिंग लिस्ट कमी करण्यास मदत होईल. त्यामुळे यंदा गणेशोत्सवादरम्यान मुंबई ते कोकण असा प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळेल. 


 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com