मुंबई... देशाची आर्थिक राजधानी. देशभरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती याच शहरात राहतात. दरशुक्रवारी कोट्यवधींचा गल्ला करणारं बॉलिवूडही याच शहरातलं. याच शहरात रस्त्यावरुन चालणाऱ्यांना मुंग्यांसारखं चिरडलं जातं. बस पकडण्यासाठी लागणारी मोठी रांग, त्यात बसमध्ये गेल्यावर शांतपणे बसायला जागाही नसते. तिथंही चेंगराचेंगरी. उभं राहण्यासाठीही संघर्ष...दुसरा पर्याय निवडावा तर मुंबईतील बहुतांश रिक्षावाल्यांची मुजोरी प्रवाशांना सहन करावी लागते. काही किलोमीटरसाठीही अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जातात. रस्त्यावर, फूटपाथवर चालायचं तर कोणीही चिरडून पुढं निघून जातं.. पण सांगायचं कुणाला? कुर्ला अपघातातील मृतांच्या नातेवाईकांकडूनही हाच सवाल उपस्थित करण्यात आला होता... आमचा माणून चिरडून मेला, पण सांगायचं कुणाला?
नक्की वाचा - माणुसकीचा मृत्यू; अर्ध शरीर गाडीखाली, महिलेच्या मृतदेहाला ओरबाडत राहिला, संतापजनक Video
तिसरं पण अत्यंत महत्त्वाचं वाहतुकीचं साधन म्हणजे मुंबईकरांची लाईफलाइन लोकल सेवा. मात्र दररोज कित्येक प्रवाशांच्या लोकलमधून पडल्याने मृत्यू होतो. किड्या मुग्यांसारखे माणसं लोकलमधून लटकत प्रवास करीत असताता. त्यात मुंबईकरांची नेहमीची एक समस्या झालीये ती म्हणजे सातत्याने उशीराने धावणारी लोकल सेवा. ही लोकसेवा नेहमी उशीराने धावतेय याचं मुख्य कारण म्हणजे रेल्वे सिग्नलमध्ये होणारी बिघाड. गेल्या सहा महिन्यात मध्य रेल्वेवर 757 वेळा सिग्नल बिघाड झालीय.
मुंबईची लाईफ लाईन म्हणून रेल्वे सेवा ओळखली जातो. मात्र हीच लाईफलाईन आता मुंबईकरांची डोकेदुखी झाली आहे. वेळेत पोहोचता यावं म्हणून मुंबईकर लोकल सेवेचा वापर करतात. मात्र लोकलच उशीराने येत असल्याकारणामुळे मुंबईकर त्रस्त झालेत. गेल्या ६ महिन्यात मध्य रेल्वेवर ७५७ वेळा सिग्नल बिघाड झालाय. आमच्या नशिबी हे नेहमीचच आहे अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा लक्ष दिलं जात नाही असा आरोप प्रवासी संघटनेकडून करण्यात आला आहे. प्रवासी सातत्याने रेल्वे ट्रॅकवर प्लास्टिक फेकून देतात. त्यामुळे तांत्रिक बिघाड होतो अशा पद्धतीची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे. वेळेचे नियोजन करण्यात कुशल असणाऱ्या मुंबईकरांचं वेळेचं गणित रेल्वे बिघडवत आहे. त्यामुळे मुंबईकरांचा संताप अधिक होतो.
नक्की वाचा - कुर्ला अपघातानंतर चालक संजय मोरेने काय केलं; बसमधील धक्कादायक CCTV फुटेज आले समोर
गेल्या सहा महिन्यात झालेला सिग्नल बिघाड
एप्रिल - 99
मे - 125
जुन - 117
जुलै -117
ऑगस्ट -187
सप्टेंबर -116
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world