जाहिरात

Lalbaugcha Raja Visarjan : लालबागच्या राजाच्या विसर्जनात विघ्न, उशीर होण्याचं काय आहे कारण?

गेल्या दोन तासांपासून बाप्पाची मूर्ती तराफ्यावर चढविण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र ते शक्य होत नसल्याचं दिसून येत आहे.

Lalbaugcha Raja Visarjan : लालबागच्या राजाच्या विसर्जनात विघ्न, उशीर होण्याचं काय आहे कारण?
राजाची मूर्ती तराफ्यावर चढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Lalbaugcha Raja Visarjan late : अनंत चतुर्दशीला (6 सप्टेंबर, शनिवार) साधारण सकाळी 10 वाजता लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या (Lalbaugcha Raja Visarjan time) मिरवणुकीला सुरुवात झाली होती. आता याला 24 तास उलटले आहेत. मात्र अद्यापही लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं नाही. सर्वसाधारणपणे सकाळी 9 ते 9.30 च्या दरम्यान राजाची मूर्ती तराफ्यावर चढते आणि विसर्जनासाठी मार्गस्थ होते. मात्र यंदा दहा वाजून गेले तरी अद्यापही राजा तराफ्यावर चढू शकलेला नाही. 

लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यास अडचणी

यंदा बाप्पाच्या विसर्जनासाठी आधीपेक्षा दुप्पट आकाराचा अत्याधुनिक तराफा दाखल करण्यात आला आहे. हा तराफा खास गुजरातहून तयार करुन आणल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या तराफ्यावर बाप्पाची मूर्ती चढविण्यात अनेक अडचणी येत असल्याचं दिसत आहे. त्याशिवाय आता भरतीची वेळ आहे. भरतीमुळे गिरगाव समुद्रात पाणी वाढत असल्याने लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढविण्यात अनेक अडचणी येत आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

राजाच्या विसर्जनाला लागणार अजून काही तास

गेल्या दोन तासांपासून बाप्पाची मूर्ती तराफ्यावर चढविण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र ते शक्य होत नाही. त्यामुळे अनेक कोळी बांधव बोटी घेऊन बाप्पाच्या जवळ येत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे राजाची मूर्ती तराफ्यावर चढवता आली नाही तर कोळी बांधवांच्या मदतीने पारंपरिक पद्धतीने लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाण्याची शक्यता आहे. 

 लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेणारा तराफा आणि मूर्तीचा पाट यांची भरतीच्या पाण्याच्या हेलकाव्यांमुळे जुळणी होण्यात अडचणी

लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेणारा तराफा आणि मूर्तीचा पाट यांची भरतीच्या पाण्याच्या हेलकाव्यांमुळे जुळणी होण्यात अडचणी

नेमकं काय घडलं?

गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे आज सकाळी आगमन झाले त्यावेळी भरतीचे पाणी वेगाने वाढत होते.  त्याचवेळी गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजाचे तराफ्याजवळ आगमन होताच वेगाने वाढलेल्या भरतीच्या पाण्यामुळे लालबागचा राजाच्या मूर्तीचा पाट तरंगू लागला. त्याचा परिणाम असा झाला की लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेणारा अत्याधुनिक तराफा आणि मूर्तीचा पाट यांची भरतीच्या पाण्याच्या हेलकाव्यांमुळे जुळणी होत नव्हती. 

दीड तास कोळी बांधव सातत्याने लालबागच्या राजाचा पाट आणि तराफा यांची जुळणी करण्याचा आटोकाट प्रयत्नं करत आहेत. मात्र भरतीच्या पाण्याचा दबाव प्रचंड वाढल्यामुळे भरतीचे पाणी कमी होण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आता लालबागच्या राजाचे विसर्जन समुद्राच्या भरतीचे पाणी थोडे कमी झाल्यावर करण्यात येईल, असं सांगितलं जात आहे. 

गुजरातहून मागवला खास तराफा (Lalbaug Raja Visarjan new Tarafa/ raft)

यंदा लालबाग राजाच्या विसर्जनासाठी गुजरातहून तराफा मागविण्यात आला आहे. हा मोटराइज्ड तराफा आहे. हा नवा तराफा ३६० अंशात फिरवता येऊ शकतो. विसर्जन करताना स्प्रिंकलर्समधून पाण्याचे फवारे उडवता येईल. मोटराज्ड तराफ्याचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे या तराफ्याला दुसऱ्या बोटीची मदत लागत नाही. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com