जाहिरात
11 days ago

Latest News Update : परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्य हादरले होते. पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी केला होता. मात्र सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे. अखेर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवाल समोर आला आहे, ज्यात पोलिसांच्या मारहाणीतचं सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकरांनी ही  याचिका दाखल केली आहे. औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नसल्याचा त्यांनी याचिकेत दावा केला आहे. औरंगजेबाच्या कबरीपासून पुढच्या पिढीला वारसा किंवा शिकवण घेण्यासारखं काहीही नसल्याचं याचिकेत दावा करण्यात आला आहे.  ऐतिहासिक वास्तूंच्या यादीतून औरंगजेबाची कबर हटवण्याची त्यांनी मागणी केली आहे. 

LIVE Updates: औरंगजेबाची कबर हटवा, हायकोर्टात याचिका दाखल

औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकरांनी केली याचिका नदाखल

 

औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नसल्याचा याचिकेत दावा

औरंगजेबाच्या कबरपासून पुढच्या पिढीला वारसा किंवा शिकवण घेण्यासारखं काहीही नसल्याचा याचिकेत दावा

ऐतिहासिक वास्तूंच्या यादीतून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी

औरंगजेबची कबर हटवल्यास भविष्यात पुन्हा यावरून जातीय तेढ निर्माण होणार नसल्याचाही याचिकाकर्त्यांचा दावा

LIVE Updates: औरंगजेबाची कबर हटवा, हायकोर्टात याचिका दाखल

औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकरांनी केली याचिका नदाखल

 

औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नसल्याचा याचिकेत दावा

औरंगजेबाच्या कबरपासून पुढच्या पिढीला वारसा किंवा शिकवण घेण्यासारखं काहीही नसल्याचा याचिकेत दावा

ऐतिहासिक वास्तूंच्या यादीतून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी

औरंगजेबची कबर हटवल्यास भविष्यात पुन्हा यावरून जातीय तेढ निर्माण होणार नसल्याचाही याचिकाकर्त्यांचा दावा

LIVE Updates: माहेरी गेलेल्या पत्नीचे पतीकडून अपहरण

- प्रेम विवाहानंतर माहेरी निघून आलेल्या पत्नीचं चक्क पतीकडून मित्रांच्या साथीने केले अपहरण

- 19 वर्षीय विवाहिता आईसोबत रस्त्याने जात असतांना पतीकडून मित्रांच्या मदतीने पत्नीचं अपहरण

- पत्नीच्या आईला मारहाण करुन केलं पत्नीचं अपहरण

- विवाहानंतर वादविवाद झाल्यानं पत्नी माहेरी निघून आल्यानं पतीच्या मनात होता राग

- बुधवारी मार्चला दुपारी सिन्नर शिर्डी रस्त्यावरील पांगरी बसस्थानकाजवळ घडला प्रकार

- अपहरणाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

- अपहरणानंतर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवत अपहत पत्नीची शिर्डी बस स्थानक परिसरातून केली सुटका तर पतीला केली अटक

- अपहरण करणाऱ्या वैभव पवार या पती विरोधात सिन्नरच्या वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

- पतीच्या फरार साथीदारांचा सिन्नर पोलिसांकडून शोध सुरू

LIVE Updates: नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्य सरकारनं स्विकारलं

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्य सरकारनं स्विकारलं

नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षात केली जाणार

राज्य शिक्षण मंडळाचे बोर्ड तेच मात्र; अभ्यासक्रम सिबीएससी बोर्डाच्या धर्तीवर

भाषा; इतिहास; भूगोल या विषयांचा अभ्यासक्रम राज्य शिक्षण मंडळच ठरवणार

सध्या इतिहासात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघलांचा इतिहास शिकवलं जातं

मात्र नवीन अभ्यासक्रमा नुसार इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी, मराठा साम्राज्य, मराठा घराणी यांचा इतिहास तपशील पद्धतीने शिकवला जाणार

Wardha News: वर्ध्यात मोठी कारवाई, 15 ट्रक, 2 टिप्परसह 16 आरोपी ताब्यात

जिल्ह्यात  वाळू संदर्भात सर्वात मोठी कार्यवाही

15 ट्रक 2 टिप्पर घेतले ताब्यात

IPS अधिकारी राहुल चव्हाण व अल्लीपुर चे ठाणेदार यांनी मिळून केली कार्यवाही

3 कोटी 34 लाख रुपयांच्या वर मुद्देमाल जप्त

16 आरोपींना घेतले ताब्यात

अल्लीपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवनी या गावाजवळ केली कार्यवाही

LIVE Updates: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट.

चाकूरकर यांनी सहकुटुंब घेतली भेट, संसद भवनात झाली भेट

जवळपास 30 मिनिट केली चर्चा. 

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि शिवराज पाटील यांच्या सून अर्चना पाटील यांच्यासह घेतली भेट

शिवराज पाटील चाकूरकर यांची भाजपसोबत जवळीक वाढत असल्याच्या चर्चा

Pune News: महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या नियुक्त्या अवघ्या 8 तासात रद्द; गटबाजीचे ग्रहण

युवक काँग्रेसलाही गटबाजीचे ग्रहण लागले आहे. प्रदेश शाखेच्या नव्याने करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या अखिल भारतीय युवक काँग्रेसने अवघ्या ८ तासांमध्ये रद्द केल्या. राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी रात्री १२ वाजता नवीन नियुक्त्यांची यादी अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपवर जाहीर केली. मात्र, भारतीय युवक काँग्रेसच्या दिल्ली मुख्यालयाने सकाळीच या नियुक्त्या रद्द केल्याचे पत्र प्रसिद्ध केले. या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले की, नियुक्त्या कोणत्याही अधिकृत मंजुरीशिवाय केल्या गेल्याने त्या अवैध ठरविण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच ज्यांनी कोणी या नियुक्त्या केल्या त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला.

अनिल परब आणि चित्रा वाघ यांचा वाद मिटला, सूत्रांची माहिती

अनिल परब आणि चित्रा वाघ यांचा वाद मिटला, सूत्रांची माहिती

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झाली बैठक

आपल्या आमदारांना समज द्या, मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांच्या चर्चेत झाला निर्णय

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या यादीत आठ शाळांचा समावेश आहे. या शाळेत पालकांनी आपल्या मुलांना प्रवेश देऊ नये, असे आवाहन केडीएमसी प्रशासनाने पालकांना केले . शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.  त्याकरिता महापालिका प्रशासनाकडून पालकांना शाळांबद्दल माहिती दिली गेली आहे. ज्या मुलांचे ऍडमिशन झालं असेल त्या मुलांना त्या शाळेतून काढून इतर शाळांमध्ये प्रवेश देण्याची व्यवस्था महापालिका करणार असल्याची माहिती केडीएमसीचे उपायुक्त संजय जाधव यांनी दिली आहे.

प्रशांत कोरटकरला अटक करुन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करा.  जालन्यात मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलन. प्रशांत कोरटकर याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं संरक्षण असल्याचा गंभीर आरोप देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आला. शिवद्रोही प्रशांत कोरटकर याला तात्काळ अटक करा. त्याच्या विरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा, अन्यथा 24 मार्चपासून राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. 

नाशिकच्या पिंपळगाव बसवंत गावात बांबूच्या गोदामाला भीषण आग

नाशिकच्या पिंपळगाव बसवंत गावात बांबूच्या गोदामाला भीषण आग

गोदामाला लागलेल्या आगीमुळे शेजारील काही दुकानांना देखील पोहोचली झळ

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू

जीवितहानी जरी नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी

CBSC सक्तीचं करणार असाल तर मग स्टेट बोर्डाचं काय होणार? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल

जर शाळेत CBSC सक्तीचं करणार असाल तर मग स्टेट बोर्डाचं काय होणार? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल 

मराठी शाळांचे काय होणार? तुमच्याकडे पायाभूत सुविधा आहे का? मंत्री दादा भुसे यांच्याशी मी बोलणार आहे आणि विषय समजून घेणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. 

मुंबईतील रस्त्यांची कामे पावसाळ्या आधीच पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

मुंबईतील रस्त्यांची कामे पावसाळ्या आधीच पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

वर्षभरात रस्त्यांची कामे सुरू आहेत ती कामे पूर्ण झाल्याशिवार नवीन कोणतेही काम हाती नाही 

दिलेले रस्त्यांचे काम पावसाळ्या आधी पूर्ण न झाल्यास महापालिका करणार कंत्राटदारांवर कारवाई

रस्त्यांची कामे आणि दुरुस्ती बाबात महापालिकेची कंत्राटदारांना डेडलाईन 

कंत्राटदारांनी निर्धारित वेळेत कामं पूर्ण करा महापालिका आयुक्तांचे आदेश

Satara News : जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी केली अटक. प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची केली होती मागणी. 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना केली अटक. सातारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेलला भीषण आग

छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेलला भीषण आग

संभाजीनगरच्या हॉटेल मराठाला आग

नागपूर हिंसाचार प्रकरणी अटक आरोपींची संख्या 100 पार

नागपूर हिंसाचार प्रकरणी सुमारे 1200 पेक्षा जास्त ज्ञात आणि अज्ञात आरोपी असून प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची संख्या 100 पार झाली आहे. काल रात्री नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं नऊ पेक्षा जास्त आरोपींना अटक केली. याशिवाय लोकल पोलीस स्टेशनकडूनही अटकसत्र सुरु आहे.   त्यामुळे अटकेत असलेल्या आरोपींची संख्या 100 पार झाली असून आज देखील काहींना अटक होण्याची शक्यता आहे. येत्या एक- दोन दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणात आरोपी अटक होण्याची शक्यता आहे. 

अंबरनाथमधील अनधिकृत मदरशाचा वीजपुरवठा खंडित, मनसेच्या पाठपुराव्यानंतर महावितरणची कारवाई

अंबरनाथमध्ये पालिकेच्या लोकल बोर्ड शाळेच्या आवारात अनधिकृत मदरसा उभारण्यात आल्याचं समोर आलं होतं. या अनधिकृत मदरशाला महावितरणने वीज मीटर सुद्धा दिलं होतं. याबाबत मनसेने महावितरण अधिकारांची भेट घेत जाब विचारल्यानंतर महावितरणने या अनधिकृत मदरशाचं वीज मीटर काढून टाकत वीज पुरवठाही खंडित केला आहे.

शेतकऱ्यांची परवानगी न घेताच जमिनीवर MIDC चे शिक्के, अंबरनाथच्या पालेगावातील प्रकार

अंबरनाथमध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनी MIDC नं परस्पर अधिग्रहित केल्या, सातबाऱ्यावर स्वतःची नोंद करून घेतली अन त्या उद्योजकांना मंजूरही करून टाकल्या. उद्योजक जेव्हा या शेतजमिनीवर फॅक्टरी उभारण्यासाठी आले, तेव्हा आपल्या जमिनी परस्पर विकण्यात आल्याचं शेतकऱ्यांना समजलं. या सगळ्याविरोधात पालेगावातील शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत.

Hingoli News : ट्रकची दुचाकीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे आज सकाळच्या सुमारास रेतीच्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. गणेश तनपुरे असे या मृत तरुणाचं नाव आहे. अवघ्या दोन दिवसानंतर या तरुणाचं लग्न होतं आणि तो वाघझळी येथे आपल्या आजीला लग्नासाठी घेऊन जाण्यासाठी आला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 

Pune News : इंदापूर तालुक्यातील उजनी धरणात वाळू माफियांविरोधात महसूल आणि पोलीस प्रशासन आक्रमक

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या हद्दीत उजनी धरणात वाळू माफियांविरोधात महसूल आणि पोलीस प्रशासन परत अॅक्शन मोडवर आले आहेत.  जिल्हाधिकारी  जितेंद्र डूडी व  बारामतीचे उपविभागीय अधिकारी  वैभव नावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या नेतृत्वात,महसूल व पोलीस पथकाने उजनी जलाशयात इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव जॅकवेल,ते करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली येथे पाठलाग करून,वाळू माफियांच्या बोटी  जिलेटिनच्या साह्याने उद्ध्वस्त केले आहेत.

विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी निवड होण्याची शक्यता

विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी निवड होण्याची शक्यता आहे. विधानसभा उपाध्यक्षपद महायुतीत एनसीपी पक्षाकडे आले असून एनसीपी पक्षातून पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच नाव जवळपास निश्चित झाले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. बनसोडे यांसह राजकुमार बडोले यांचे नाव चर्चेत होते. संख्याबळ नसताना महाविकास आघाडी नेते अद्याप विरोधी पक्षनेते पद मिळावे यासाठी प्रयत्न करत आहे. दुसरीकडे विधानसभा उपाध्यक्ष पद नियुक्ती होण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: