नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या हिंसाचार प्रकरणात इस्लामिक संघटनेच्या दोन जणांना नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रांचने अटक केली आहे. इस्लामिक युथ फेडरेशनच्या दोन पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. मोहम्मद फैजान उर्फ खालिद मोहम्मद साकाऊल्ला खतीब आणि मोहम्मद शहाबाद काजी मोहम्मद सादिक असे चाळीशीतील वय असलेल्या अटकेतील पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. सोमवारी रात्री हिंसाचार घडण्यापूर्वी फैजान आणि शहाबाज जमावासोबत होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हे दोघे त्यामध्ये आढळले.
मालेगावातील हिंदू संत संमेलनाला परवानगी, साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उपस्थितीत संमेलन
मालेगावातील हिंदू संत संमेलनाला परवानगी देण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची उपस्थितीती या संमेलनाला असेल. मुंबई उच्च न्यायालयालयाने सशर्त ही परवानगी दिली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रक्षोभक भाषण न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यक्रम संपवण्याचे निर्देश ही देण्यात आले आहेत. गुढीवाढव्याला हे संमेलन होणार आहे. संमेलनात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना हिंदू वीर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
पुण्यातल्या राज कंपनीला भीषण आग
पुण्यातील मुळशी तालुक्यातील नामांकित कंपनीला भीषण आग लागली आहे. मुळशी गावातील घोटवडे फाटा जवळ असणाऱ्या राज कंपनीला ही भीषण आग लागली. केमिकल मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी अग्निशामक वाहनासह रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या आहेत. अग्निशमनदलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
म्यानमार भूकंपात मृतांचा आकडा 107 वर
म्यानमार भूकंपात मृत्यांचा आकडा 107 वर गेला आहे. तर 350 जण जखमी झाले आहेत. यात 103 जण हे म्यानमारमध्ये मरण पावले आहेत. तर थायलंडमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. 50 जण जखमी झाले आहेत. चीनमध्ये ही दोन जण जखमी झाले आहेत.
मंत्री चंद्रकांत पाटील आणि आशीष शेलार यांची किल्ले रायगडाला भेट
मंत्री चंद्रकांत पाटील आणि आशीष शेलार यांची किल्ले रायगडाला भेट दिली आहे. अमित शहा यांच्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आढावा घेतला आहे. विविध विभागाच्या अधिकाऱ्यां बरोबर त्यांनी चर्चा ही केली. किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या जिर्णोद्धाराला यंदा 100 वर्षे पुर्ण होत आहेत.
Kolhapur News : प्रशांत कोरटकरवर सुनावणी झाल्यानंतर वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न
Kolhapur News : प्रशांत कोरटकरवर सुनावणी झाल्यानंतर वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न
अमित भोसले असं वकिलाचं नाव
कोर्टातून बाहेर काढत असताना कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न
आज सकाळपासून संबंधित वकिलाने कोरटकरची सुनावणी ऐकली होती
प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीत 30 मार्चपर्यंत वाढ
प्रशांत कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढला
प्रशांत कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी
कोरटकरला 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीतच राहावं लागणार
महाविकास आघाडीत लोकलेखा समितीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नाराजी वाढणार
महाविकास आघाडीत लोकलेखा समितीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नाराजी वाढणार
विजय वड्डेटीवार यांना लोकलेखा समितीच अध्यक्षपद दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नाराजी, सूत्रांची माहिती
महाविकास आघाडीत लोकलेखा समितीचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला, विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला देण्याबाबत चर्चा मात्र प्रत्यक्षात वेगळं चित्र
दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे भेटी दरम्यान महाराष्ट्रातील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली
येत्या काही दिवसांत याबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत चर्चा करण्याबाबत शरद पवारांकडून आश्वासन दिल्याच समजते
"आमदार रोहित पवारांची एसआयटी चौकशी करून तत्काळ अटक करा"
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हल्ल्याचा कट रचला गेला आहे. यांचा मास्टरमाईंड आमदार रोहित पवार आहेत. तसेच जयकुमार गोरे यांच्यावरील आरोपाबाबत आमदार रोहित पवार जबाबदार आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या विरोधात पंढरपुरात सकल बहुजन समाज आणि पडळकर समर्थक यांनी एकत्रित येऊन निदर्शने केली. रोहित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी रोहित पवार यांची एसआयटी चौकशी करून त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रशांत कोरटकर ला सकाळीच पोलिसांनी कोर्टात नेऊन ठेवलं
प्रशांत कोरटकर ची तीन दिवसाची पोलीस कोठडी आज संपली
सकाळी 11 वाजता कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात करणार हजर
कोरटकर ला सकाळीच पोलिसांनी कोर्टात नेऊन ठेवलं
25 तारखेला शिवभक्तांनी केलेल्या गोंधळानंतर पोलिसांची खबरदारी
विधिमंडळाच्या समित्यांमधून धनंजय मुंडे, छगन भुजबळांना डावललं
विधिमंडळाच्या वेगवेगळ्या समित्या जाहीर झाल्या आहेत. मात्र या समित्यांमध्ये वादग्रस्त राहिलेले माजी मंत्री धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वेगवेगळ्या आमदारांना वेगवेगळ्या समितीत घेण्यात आला आहे. मात्र धनंजय मुंडे यांना कोणत्याच समितीमध्ये स्थान दिले गेले नाही.
पुणे शहरात गुन्हेगारींचे 2576 हॉटस्पॉट पुणे पोलिसांकडून मॅपिंग
पुणे शहरात गुन्हेगारींचे 2576 हॉटस्पॉट पुणे पोलिसांकडून मॅपिंग
सर्वाधिक गुन्हे परिमंडळ पाच आणि तीन मधील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडत असल्याचे समोर
कॉप्स 24 मार्फत पुणे पोलिसांचे दिवसातून पाच ते सहा वेळा
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जास्त गुन्हे घडणाऱ्या ठिकाणी रेड झोन हॉटस्पॉट करून लक्ष
दोन सत्रात पाच वेळा गस्त घालण्यावर पुणे पोलिसांचा भर
सिंधुदुर्गात बांबू महागला; गुढीपाडवा सणाच्या तोंडावर नागरिकांना फटका
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण भागात बांबूशेती मोठ्या प्रमाणात होते. सिंधुदुर्गातील बांबू हा उच्च प्रतीचाही असतो. त्यामुळे हा बांबू कागद, अगरबत्ती काड्या निर्मितीसाठी राज्यात आणि राज्याबाहेर विक्रीस पाठविला जातो. तसेच गुढीपाडव्याच्या सणात बांबूची गुढी उभारली जाते. मात्र मागील काही वर्षात जिल्ह्यात बांबूची तोड मोठ्या प्रमाणात झाली असल्याने ग्रामीण भागात बांबू मिळत नाही. काही वर्षांपूर्वी बांबूच्या किमती 20 ते 30 रुपये होती. तीआता 150 ते 200 रुपये झाली आहेत.
मनसेच्या होर्डिंगवरून संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
मनसेच्या होर्डिंगवर बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो काल पाहायला मिळाले. मात्र ती पक्षाची भूमिका नसल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचसोबत महापौर बंगलावरून त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला देखील लगावला आहे. महापौर बंगला घशात घालताना बाळासाहेब देशाचे पण एरवी तुमचे वडील असं का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
माननीय बाळासाहेबांचा फोटो होर्डिंग वर लावणे हे पक्षाचं धोरण नाही .एखाद्या उत्साही कार्यकर्त्याची भावना असू शकते पण श्री उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे महापौर बंगला घशात घालायचा होता तेव्हा बाळासाहेब देशाचे एरवी ते फक्त तुमचे वडील असं कस काय ?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 28, 2025
पोर्शे अपघात प्रकरण, आरोपी डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याची पोलिसांची मागणी
पोर्शे अपघात प्रकरणात रक्ताची अदलाबदल करणाऱ्या डॉक्टरांचे परवाने रद्द करा. पुणे पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला पाठवले पत्र. प्रयोगशाळा प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हार्ड यांचा परवाना रद्द करण्याची मागणी. दोन्ही डॉक्टर प्रकरण झाल्यापासून आतापर्यंत येरवडा कारागृहात अटक आहेत. यापूर्वी याच प्रकरणात पुणे पोलिसांनी येरवडा पोलीस स्टेशनमधील दोन पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, असा प्रस्ताव दिला होता. याच प्रकरणात आता या दोन डॉक्टरांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपूर शहरात 47 चौकात स्वागत केले जाणार
गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपूर शहरात 47 चौकात स्वागत केले जाणार आहे. जवळपास 37 किलोमीटर रस्त्यावर पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 वर्षानंतर रेशीमबागेतील संघ संस्थापक डॅा. हेडगेवार यांच्या समाधीस्थळी स्मृती मंदिरास भेट देणार आहे. स्मृतीमंदिराला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरणार आहे.
भिवंडीत इमारतीचे प्लास्टर कोसळून सहा महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
भिवंडी शहरातील नायगाव परिसरात अन्सारी अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील फ्लॅटचे प्लास्टर कोसळून सहा महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत आई देखील गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. अपार्टमेंटच्या तळमजल्यावर राहणाऱ्या कुटुंबावर अचानक छताचे प्लास्टर कोसळले. त्यात घरात झोपलेल्या आई व बाळ गंभीर जखमी झाल्याने तत्काळ त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान सहा महिन्याच्या चिमुकल्याला दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर आई जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहे.