Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आज भाजप उमेदवारी अर्ज जाहीर करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे इतर पक्ष उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विधानसभेच्या निवडणुका 20ऑक्टोबर रोजी आणि निकाल 23 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. दुसरीकडे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता सलमान खानला धमकीचा मेसेज आला आहे. 17 ऑक्टोबरला रात्री मुंबई वाहतूक कंट्रोल रुमच्या व्हॉट्सअॅप नंबरवर सलमान खानला (Salman Khan) धमकी देण्यासंदर्भात एक मेसेज आला आहे.
रवी राणा यांचा हुकमी एक्का बच्चू कडूंसोबत, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार रवी राणा यांना मोठा धक्का बसला आहे. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्ते व त्यांचे अत्यंत विश्वासू माजी जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांचा बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षात प्रवेश. अचलपूर येथे बच्चू कडू यांच्या उपस्थितीत जितू दुधाने यांचा प्रहारमध्ये प्रवेश. कालच जितू दुधाने यांनी रवी राणा यांच्या पक्षाचा दिला होता राजीनामा. "माझ्यावर आता हल्ला पण होऊ शकतो. माझ्या जीवाचं काही कमी जास्त होऊ नये यासाठी पोलीस आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी काळजी घ्यावी. मला संरक्षण द्यावं", असं जितू दुधाने यांनी म्हटलं.
मध्ये रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्टेशनवर लोकलचा डब्बा घसरला
मध्ये रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्टेशनवर लोकलचा डब्बा घसरला, कल्याण प्लॅटफॉर्म नंबर 2 वरील घटना.
दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, डब्बा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू.
हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळात नियुक्ती
हर्षवर्धन पाटील संसदीय मंडळात
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळात नियुक्ती
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली मान्यता
उद्याच मुंबईत संसदीय मंडळाची बैठक होणार आहे.
संसदीय मंडळाच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार
गणेश नाईकांनी आपल्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवल्याची सूत्रांची माहिती
भाजप आमदार गणेश नाईकांनी आपल्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. क्रिस्टल हाऊस येथे खलबतं. भाजपकडून दोन उमेदवारी मिळत नसल्याने नाईक कुटुंब नाराज असून भाजप सोडायचं की नाही यावर बैठकीत चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजप सोडून जायचं तर कोणत्या पक्षात याबाबत नगरसेवकांची मते जाणून घेणार. आजच्या रात्रीत निर्णय घेण्याच्या पवित्र्यात नाईक कुटुंब असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवेंचा ठाकरे गटात प्रवेश
अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, उपनेते आमदार सचिन अहिर तसेच इतर शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते
नंदुरबारच्या कोंडाईबारी घाटात जामनेर- सूरत बसचा भीषण अपघात, 8 जण जखमी
नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात जामनेर- सूरत बसचा भीषण अपघात, आठ जण जखमी, तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर.
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात बस आणि ट्रकचा भीषण अपघात.
कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी 5 वाजल्याच्या सुमारास अपघात.
जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
महामार्गावर अपघातामुळे वाहतूक कोंडी.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले?
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले?
आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अंतिम निर्णय झाल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटाचे पाच उमेदवार जवळपास निश्चित. पाचही उमेदवारांना तयारी करण्याचे पक्षांकडून आदेश दिल्याची माहिती, लवकरच एबी फॉर्म दिले जाणार.
- छत्रपती संभाजीनगर मध्य - किशनचंद तनवाणी
- छत्रपती संभाजीनगर पश्चिम - राजू शिंदे
- वैजापूर मतदारसंघ - दिनेश परदेशी
- कन्नड मतदारसंघ - उदयसिंह राजपूत
- सिल्लोड मतदारसंघ - सुरेश बनकर
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दशरथ पाटील निवडणूक लढवण्यास इच्छुक
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दशरथ पाटील हे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. आज त्यांनी पुणे येथील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेतली. यावेळी संभाजीराजे यांच्यासोबत त्यांची सकारात्मक भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 2 दिवसात त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.
नाशिकमधील अर्पण सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी असलेली चारचाकी गाडीने घेतला पेट
नाशिकमधील अर्पण सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी असलेली चारचाकी गाडीने घेतला पेट.
सीएनजी गॅस गाडीला लागली आग, आग लागल्याने सोसायटीमधील लोकांची उडाली तारांबळ.
आगीत चारचाकी गाडी जळून खाक, नाशिक रोड विहित गाव परिसरातील घटना.
आमदार सतीश चव्हाण यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबन
आमदार सतीश चव्हाण यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबन;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली कारवाई.
जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल आमदार सतीश चव्हाण यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे.
Live Update : सुट्ट्या पैशांवरून वाद, कल्याण स्थानकावरील महिला तिकीट क्लार्कला जबर मारहाण
कल्याण रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार घडला आहे. तिकीट काढताना सुट्टया पैशांवरुन वाद झाल्यावर महिला तिकीट क्लार्कला बेदम मारहाण करण्यात आली. रोशना पाटील या जमखी महिलेला तिकीट क्लार्कला रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणात एका तरुणाला कल्याण जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले. अन्सार शेख असे तिकीट क्लार्कला मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
बाबा सिद्दीकी हत्या आणि सलमान खानच्या धमकीसंदर्भात फडणवीसांसोबत चर्चा
बाबा सिद्दिकी यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर सागर बंगल्यामध्ये दाखल झाले. त्यांची देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झाली. यावेळी बाबा सिद्दीकी हत्या आणि सलमान खानच्या धमकी संदर्भात चर्चा करण्यात आली. झिशान सिद्दीकीदेखील मारेकऱ्यांच्या रडारवर असल्याची माहिती आहे.
Live Update : दिपक साळुंखे आणि राजन तेलींचा उबाठा गटात पक्षप्रवेश
दिपक साळुंखे आणि राजन तेलींचा उबाठा गटात पक्षप्रवेश https://t.co/RBAHccnnaH
— NDTV Marathi (@NDTVMarathi) October 18, 2024
Live Update : मविआतील काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद विकोपाला...
नाना पटोले यापुढे जागा वाटपाच्या बैठकीत असल्यास शिवसेना ठाकरे गटाचे नेते जागा वाटपाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका
जागा वाटप हे नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे अडत असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे म्हणणं आहे
Live Update : कोल्हापुरात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, जिल्ह्यातील सर्व भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस
कोल्हापुरात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, जिल्ह्यातील सर्व भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस
भात पिकांसह इतरही पिकांच मोठं नुकसान
गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे नागरिक हैराण
गगनबावड्यात सर्वाधिक पाऊस
Live Update : सुनेत्रा पवारांच्या वाढदिवशी अजित पवारांच्या पत्नीला खास शुभेच्छा!
Live Update : महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला सुरुवात...
महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला सुरुवात...
Live Update : राष्ट्रवादी देणार एकाच घरात दोन तिकीटं...
राष्ट्रवादी देणार एकाच घरात दोन तिकिटे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबईतील दोन उमेदवार नक्की झाले आहेत. २३ ॲाक्टोबरला सना मलिक अनुशक्ती नगरमधून अर्ज भरणार तर २८ ॲाक्टोबरला नवाब मलिक शिवाजी नगर मानखूर्दमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार. मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवादीची या मतदारसंघात दोघांना ही उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आहे. .
Live Update : कल्याण पूर्वेत शिवसेना शहर प्रमुखांचे बंडाचे संकेत..
कल्याण पूर्वेत शिवसेना शहर प्रमुखांचे बंडाचे संकेत..
भाजपने गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिली तर अपक्ष निवडणूक लढवणार. महेश गायकवाड यांचा भाजपला इशारा. गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व मतदारसंघ बकाल करून ठेवलाय, महेश गायकवाड यांचा आरोप
सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी घेतली अजित पवारांची भेट
सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पक्ष कार्यालयात दाखल झाले आहे. तासगाव विधानसभा मतदार संघासाठी चर्चा करण्यासाठी संजय काका पाटील हे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. संजय पाटील यांचे चिरंजीव सध्या अजित पवार गटाकडून कवठे महाकाळ विधानसभेसाठी इच्छुक आहेत. लवकरच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाकडून रोहित पाटील निवडणूक लढणार आहेत.
पुढील 48 तासात शरद पवार एनसीपी पक्षाची यादी अधिकृत येणार - सूत्र
पुढील 48 तासात शरद पवार एनसीपी पक्षाची यादी अधिकृत येणार - सूत्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टप्प्या टप्प्याने आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करणार आहे. सुरुवातीला सध्याचे विद्यमान पार्टीकडे आमदारांची उमेदवारी जाहीर होईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील बड्या नेत्याची माहिती..
INDIA VS NEW ZEALAND TEST MATCH- भारत विरुद्ध न्यूझीलंझड सामन्याचा आजचा तिसरा दिवस न्यूझीलंझडने ओलांडला 200 चा आकडा
INDIA VS NEW ZEALAND TEST MATCH- भारत विरुद्ध न्यूझीलंझड सामन्याचा आजचा तिसरा दिवस न्यूझीलंझडने ओलांडला 200 चा आकडा
बोंगळुरमध्ये सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंझड सामन्याचा आजचा तिसरा दिवस आहे. सामन्यात भारताची चांगली सुरुवात झाली आहे. न्यूझीलंझड टीमचे 60 ओवरमध्ये 204 रन, 5 विकेट .
Live Update : ‘शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा स्वीकारावी’- केंद्राकडून शरद पवारांची विनंती
‘शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा स्वीकारावी’- केंद्राकडून शरद पवारांची विनंती
केंद्र सरकारनं शरद पवारांना विनंती केल्याची सूत्रांची माहिती आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महत्त्वाच्या व्यक्तींना केंद्रीय गृहमंत्रालयानं सुरक्षा घेण्याची विनंती केली आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयानं शरद पवारांना सुरक्षा देऊ केली होती. परंतु शरद पवारांनी सुरक्षा नाकारली होती. घरात आणि गाडीत सुरक्षा रक्षक नको असल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. शिवाय सुरक्षा रक्षकांची राहण्याची व्यवस्था करण्यास असमर्थता शरद पवारांनी दर्शविली होती.
आचारसंहिता लागण्याच्या तासभर आधी सरकारचे शेकडो निर्णय - अंबादास दानवे
आदर्श आचारसंहिता लागण्याच्या तासभर अगोदर महाराष्ट्रातील महायुती सरकारने घाईघाईने शेकडो निर्णय घेण्यात आले. यामध्ये अनेक आर्थिक, धोरणात्मक गडबडी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रात निःपक्षपातीपणे निवडणूक घेण्यासाठी या निर्णयाची चौकशी @ECISVEEP ने करावी यासाठी देशाच्या… pic.twitter.com/vkWzhU9VJr
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 18, 2024
Live Update : रायगड जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का
रायगड जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का
माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार तुतारी हाती घेणार. आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ज्ञानदेव पवार हे आदिती तटकरे यांच्या विरोधात श्रीवर्धन मधून लढण्याची शक्यता आहे. जागा वाटपात श्रीवर्धन मतदार संघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणार. ज्ञानदेव पवार यांनी यापूर्वी रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापतीपद भूषवले आहे. मागील वेळी म्हणजे २०१९ साली त्यानी श्रीवर्धनमधून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक देखील लढवली होती.
परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष नियुक्तीमुळे महायुतीचा पारंपरिक मतदार दुरावण्याची शक्यता
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच स्थापन करण्यात आलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदावर आशिष दामले यांची नियुक्ती करण्यात आलीय. मात्र या नियुक्तीमुळे मराठवाड्यातील ब्राह्मण समाजात नाराजी व्यक्त केली जात आहे.या नियुक्तीमुळे महायुतीचा पारंपरिक मतदार मानला जाणारा ब्राह्मण समाज महायुतीपासून दुरावण्याची शक्यता आहे. ब्राह्मण समाजाकरता आंदोलन केलेल्या मराठवाड्यातलाच प्रतिनिधित्व मिळावे अशी समाजाची अपेक्षा आहे.
Live Update : परशुराम घाटातील संरक्षक भिंती खचण्याच्या घटना रोखण्यासाठी गॅबियन भिंती उभारण्याचा प्रस्ताव
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंती खचण्याच्या घटना रोखण्यासाठी या ठिकाणी गॅबियन भिंती उभारण्याचा प्रस्तावावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून विचार सुरु आहे. परशुराम घाटात उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंती एकापाठोपाठ एक कोसळू लागल्या आहेत, त्यामुळे हा घाट अधिक चर्चेत आला आहे. बुधवारी कोसळलेल्या भिंतीच्या ठिकाणचा मातीचा भराव गुरूवारीही कोसळत होता. या घटनांमुळे घाटातील माथ्यावर व पायथ्याशी वसलेल्या गावात तसेच प्रवास करणाऱ्या वाहनधारकांतही भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे धोकादायक वाटत असलेल्या संरक्षक भिंती पाडून तेथे गॅबियन भिंत उभारण्याच्या प्रस्तावावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून विचार सुरू करण्यात आला आहे.
Live Update : राजन तेली यांचा भाजपला रामराम, ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
भाजपाचे नेते राजन तेली हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामुळे सावंतवाडीत मंत्री दीपक केसरकरांची चिंता वाढली आहे. भाजपाचे माजी आमदार राजन तेली यांनी अखेर भाजपाला रामराम केला आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी करत असलेले तेली शिवसेनेत घरवापसी करणार आहेत.