5 minutes ago
मुंबई:

Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आज भाजप उमेदवारी अर्ज जाहीर करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे इतर पक्ष उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विधानसभेच्या निवडणुका 20ऑक्टोबर रोजी आणि निकाल 23 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. दुसरीकडे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता सलमान खानला धमकीचा मेसेज आला आहे. 17 ऑक्टोबरला रात्री मुंबई वाहतूक कंट्रोल रुमच्या व्हॉट्सअॅप नंबरवर सलमान खानला (Salman Khan) धमकी देण्यासंदर्भात एक मेसेज आला आहे. 

Oct 18, 2024 14:08 (IST)

Live Update : सुनेत्रा पवारांच्या वाढदिवशी अजित पवारांच्या पत्नीला खास शुभेच्छा!

Oct 18, 2024 12:22 (IST)

Live Update : महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला सुरुवात...

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला सुरुवात...

Oct 18, 2024 11:48 (IST)

Live Update : राष्ट्रवादी देणार एकाच घरात दोन तिकीटं...

राष्ट्रवादी देणार एकाच घरात दोन तिकिटे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबईतील दोन उमेदवार नक्की झाले आहेत. २३ ॲाक्टोबरला सना मलिक अनुशक्ती नगरमधून अर्ज भरणार तर २८ ॲाक्टोबरला नवाब मलिक शिवाजी नगर मानखूर्दमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार. मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवादीची या मतदारसंघात दोघांना ही उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आहे. .

Oct 18, 2024 11:41 (IST)

Live Update : कल्याण पूर्वेत शिवसेना शहर प्रमुखांचे बंडाचे संकेत..

कल्याण पूर्वेत शिवसेना शहर प्रमुखांचे बंडाचे संकेत..

भाजपने गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिली तर अपक्ष निवडणूक लढवणार. महेश गायकवाड यांचा भाजपला इशारा.  गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व मतदारसंघ  बकाल करून ठेवलाय, महेश गायकवाड यांचा आरोप

Advertisement
Oct 18, 2024 10:59 (IST)

सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी घेतली अजित पवारांची भेट

सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पक्ष कार्यालयात दाखल झाले आहे. तासगाव विधानसभा मतदार संघासाठी चर्चा करण्यासाठी संजय काका पाटील हे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. संजय पाटील यांचे चिरंजीव सध्या अजित पवार गटाकडून कवठे महाकाळ विधानसभेसाठी इच्छुक आहेत. लवकरच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाकडून रोहित पाटील निवडणूक लढणार आहेत. 

Oct 18, 2024 10:57 (IST)

पुढील 48 तासात शरद पवार एनसीपी पक्षाची यादी अधिकृत येणार - सूत्र

पुढील 48 तासात शरद पवार एनसीपी पक्षाची यादी अधिकृत येणार - सूत्र 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टप्प्या टप्प्याने आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करणार आहे. सुरुवातीला सध्याचे विद्यमान पार्टीकडे आमदारांची उमेदवारी जाहीर होईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील बड्या नेत्याची माहिती..

Advertisement
Oct 18, 2024 10:42 (IST)

INDIA VS NEW ZEALAND TEST MATCH- भारत विरुद्ध न्यूझीलंझड सामन्याचा आजचा तिसरा दिवस न्यूझीलंझडने ओलांडला 200 चा आकडा

INDIA VS NEW ZEALAND TEST MATCH-  भारत विरुद्ध न्यूझीलंझड सामन्याचा आजचा तिसरा दिवस न्यूझीलंझडने ओलांडला 200 चा आकडा

बोंगळुरमध्ये सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंझड सामन्याचा आजचा तिसरा दिवस आहे. सामन्यात भारताची चांगली सुरुवात झाली आहे. न्यूझीलंझड टीमचे  60 ओवरमध्ये 204 रन, 5 विकेट .

Oct 18, 2024 10:09 (IST)

Live Update : ‘शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा स्वीकारावी’- केंद्राकडून शरद पवारांची विनंती

‘शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा स्वीकारावी’- केंद्राकडून शरद पवारांची विनंती

केंद्र सरकारनं शरद पवारांना विनंती केल्याची सूत्रांची माहिती आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महत्त्वाच्या व्यक्तींना केंद्रीय गृहमंत्रालयानं सुरक्षा घेण्याची विनंती केली आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयानं शरद पवारांना सुरक्षा देऊ केली होती. परंतु शरद पवारांनी सुरक्षा नाकारली होती. घरात आणि गाडीत सुरक्षा रक्षक नको असल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. शिवाय सुरक्षा रक्षकांची राहण्याची व्यवस्था करण्यास असमर्थता शरद पवारांनी दर्शविली होती.

Advertisement
Oct 18, 2024 09:13 (IST)

आचारसंहिता लागण्याच्या तासभर आधी सरकारचे शेकडो निर्णय - अंबादास दानवे

Oct 18, 2024 09:09 (IST)

Live Update : रायगड जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का

रायगड जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का 

माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार तुतारी हाती घेणार. आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ज्ञानदेव पवार हे आदिती तटकरे यांच्या विरोधात श्रीवर्धन मधून लढण्याची शक्यता आहे. जागा वाटपात श्रीवर्धन मतदार संघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणार. ज्ञानदेव पवार यांनी यापूर्वी रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापतीपद भूषवले आहे. मागील वेळी म्हणजे २०१९ साली त्यानी श्रीवर्धनमधून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक देखील लढवली होती.

Oct 18, 2024 08:06 (IST)

परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष नियुक्तीमुळे महायुतीचा पारंपरिक मतदार दुरावण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच स्थापन करण्यात आलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदावर आशिष दामले यांची नियुक्ती करण्यात आलीय. मात्र या नियुक्तीमुळे मराठवाड्यातील ब्राह्मण समाजात नाराजी व्यक्त केली जात आहे.या नियुक्तीमुळे महायुतीचा पारंपरिक मतदार मानला जाणारा ब्राह्मण समाज महायुतीपासून दुरावण्याची शक्यता आहे. ब्राह्मण समाजाकरता आंदोलन केलेल्या मराठवाड्यातलाच प्रतिनिधित्व मिळावे अशी समाजाची अपेक्षा आहे. 

Oct 18, 2024 08:03 (IST)

Live Update : परशुराम घाटातील संरक्षक भिंती खचण्याच्या घटना रोखण्यासाठी गॅबियन भिंती उभारण्याचा प्रस्ताव

मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंती खचण्याच्या घटना रोखण्यासाठी या ठिकाणी गॅबियन भिंती उभारण्याचा प्रस्तावावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून विचार सुरु आहे. परशुराम घाटात उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंती एकापाठोपाठ एक कोसळू लागल्या आहेत, त्यामुळे हा घाट अधिक चर्चेत आला आहे. बुधवारी कोसळलेल्या भिंतीच्या ठिकाणचा मातीचा भराव गुरूवारीही कोसळत होता. या घटनांमुळे घाटातील माथ्यावर व पायथ्याशी वसलेल्या गावात तसेच प्रवास करणाऱ्या वाहनधारकांतही भीतीचं वातावरण पसरलं आहे.  त्यामुळे धोकादायक वाटत असलेल्या संरक्षक भिंती पाडून तेथे गॅबियन भिंत उभारण्याच्या प्रस्तावावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून विचार सुरू करण्यात आला आहे.

Oct 18, 2024 08:02 (IST)

Live Update : राजन तेली यांचा भाजपला रामराम, ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

भाजपाचे नेते राजन तेली हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामुळे सावंतवाडीत मंत्री दीपक केसरकरांची चिंता वाढली आहे. भाजपाचे माजी आमदार राजन तेली यांनी अखेर भाजपाला रामराम केला आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी करत असलेले तेली शिवसेनेत घरवापसी करणार आहेत.