जाहिरात

ठाणेकरांसाठी गुडन्यूज! मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, क्लस्टर योजनेला गती मिळणार

Thane News : ठाण्यातील क्लस्टर योजनेसाठी 6 हजार 49 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.  टेकडी बंगला, हजुरी व किसन नगर भागात क्लस्टर गृहनिर्माण प्रकल्प राबवण्यात येत आहे. 

ठाणेकरांसाठी गुडन्यूज! मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, क्लस्टर योजनेला गती मिळणार

ठाणेकरांसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे येथील क्लस्टर योजनेसाठी महाप्रित 5 हजार कोटी उभारणार आहे. त्यामुळे ठाण्यातील क्लस्टर योजनेला गती मिळण्याची शक्यता आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ठाणे येथील महत्वाकांक्षी नागरी पुनर्निर्माण कार्यक्रमांतर्गत क्लस्टर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या महाप्रित या कंपनीस 5 हजार कोटी इतका निधी गुंतवणूकदारांकडून इक्वीटी व कर्जरोख्याच्या स्वरुपात उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 

(नक्की वाचा-  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू, मंत्रिमंडळ बैठकीतील 14 निर्णय)

ठाण्यातील क्लस्टर योजनेसाठी 6 हजार 49 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.  टेकडी बंगला, हजुरी व किसन नगर भागात क्लस्टर गृहनिर्माण प्रकल्प राबवण्यात येत आहे. 

(नक्की वाचा- मोठी बातमी! मविआचं जागा वाटप ठरलं, मुंबईतल्या 99 टक्के जागांवर सहमती)

त्याचप्रमाणे भिवंडीतील चाविंद्रे, पोगाव येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिका, चंद्रपूर महापालिकेअंतर्गत म्हाडाच्या कोसरा येथे सदनिका, यवतमाळ व वडगाव येथील सदनिका, ठाणे, नागपूर व पुणे महापालिकेत अक्षय ऊर्जा खर्च बजेट मॉडेलवर  आधारित प्रकल्प, मुंबई महानगरात ईव्ही पार्क, मेडीसिटी, मॅनग्रोव्ह पार्क, केमिकल हब, डिजिटल युनिव्हर्सिटी हे प्रकल्प देखील राबवण्यात येतील.  या सर्व प्रकल्पांना मिळून 10 हजार कोटी रुपये लागतील. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू, मंत्रिमंडळ बैठकीतील 14 निर्णय
ठाणेकरांसाठी गुडन्यूज! मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, क्लस्टर योजनेला गती मिळणार
Thackeray group MLA Uday Singh Rajput present at airport to welcome PM Narendra Modi
Next Article
ठाकरे गटाचा आमदार भाजपच्या वाटेवर, PM नरेंद्र मोदींच्या स्वागतावेळी काय घडलं?