जाहिरात
This Article is From Sep 25, 2024

Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण, घरी जाताना हाल, शाळांना सुटी जाहीर

Mumbai Rain : खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई शहरातील सर्व शाळांना सुटी देण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. 

Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण, घरी जाताना हाल, शाळांना सुटी जाहीर
मुंबई:

मुंबईत मोठ्या ब्रेकनंतर बुधवारी (25 सप्टेंबर) पावसानं दमदार कमबॅक केलं. बुधवारी संध्याकाळीच पावसाचा जोर वाढला. त्यामुळे घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे हाल झाले. या पावसामुळे संध्याकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यानंतर काही काळ ठप्प झाली होती. शहरातील अनेक भागात पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. त्यामुळे रस्त्यानं जाणाऱ्या मुंबईकरांनाही मोठी कसरत करावी लागली. कुर्ला, विक्रोळी, भांडूपसह वेगवेगळ्या ठिकाणी स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. गुरुवारी रात्री अखेर ठप्प पडलेली लोकलची वाहतूक सुरु झाली पण, पावसामुळे लोकल संथगतीनं सुरु होती. त्यामुळे मुंबईकरांना घरी जाण्यासाठी बराच त्रास सहन करावा लागला.

मुंबईतील शाळांना सुट्टी 

मुंबईत गुरुवारी (26 सप्टेंबर) सकाळी 8.30 वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई शहरातील सर्व शाळांना सुटी देण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. 

( नक्की वाचा : Mumbai Rain : मुसळधार पावसाचा मुंबईला फटका, मध्य रेल्वे कोलमडली! )

प्रशासनाची तयारी काय?

मुंबईतील मुसळधार पावासामुळे प्रशासनानंही अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. मुंबईतील मुसळधार पावसामुळे महापालिका आयुक्तांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना तातडीच्या आणि महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. IMD द्वारे जारी केलेल्या रेड अलर्ट इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर वॉर्डच्या कार्यकारी अभियंत्याला वॉर्ड कंट्रोल रूममध्ये उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे. 

मुख्य अभियंता, स्ट्रॉम ड्रेनेज विभाग SWD कर्मचारी यांनी निर्जलीकरण पंप सुरु आहेत की नाही याची करावी. त्याचबरोबर खात्री करण्यासाठी आवश्यकतेनुसार पुढील  खात्री करण्यासाठी सांगण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी उपमुख्य अभियंता झोन यांना रात्री आपापल्या परिमंडळात उपस्थित राहावं असे आदेश देण्यात आले आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: