जाहिरात

पोलीस दलात मोठा फेरबदल! 16 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विश्वास नांगरे पाटील नागपूरचे पोलीस आयुक्त

Maharashtra Govt Transfer 16 IPS Officers: मोठी बातमी! महाराष्ट्रात 16 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाला कोणतं पद मिळालं? वाचा सविस्तर...

पोलीस दलात मोठा फेरबदल! 16 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विश्वास नांगरे पाटील नागपूरचे पोलीस आयुक्त
"Maharashtra Govt Transfer 16 IPS Officers: राज्यात पोलीस विभागात मोठा फेरबदल"
NDTV Marathi

- सागर कुलकर्णी, प्रतिनिधी

Maharashtra Govt Transfer 16 IPS Officers: गृहविभागाने मंगळवारी (23 जून) पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीचे आदेश जारी केले. या फेरबदलात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अपर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांची नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची एसीबीच्या अपर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. या मोठ्या फेरबदलांतर्गत पोलीस विभागातील 16 आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

(नक्की वाचा : IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांना धक्का! यावेळी बदली नाहीतर जबाबदारीच काढून घेतली)

16 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या | Maharashtra Govt Transfer 16 IPS Officers  

अधिकाऱ्यांचे नावविद्यमान पदस्थापनाबदली/पदोन्नती
1. प्रशांत मोहितेपोलीस उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर शहरपोलीस उप आयुक्त, डायल 112, नवी मुंबई
2. निलभ रोहनपोलीस अधीक्षक, हिंगोलीपोलीस अधीक्षक, नांदेड
3. अभिनाश कुमारपोलीस अधीक्षक, नांदेडपोलीस उप आयुक्त, पुणे शहर
4. श्रेणिक लोढाअपर पोलीस अधीक्षक, बुलढाणापोलीस अधीक्षक, हिंगोली
5. रुपाली अंबुरेपोलीस उप आयुक्त, डायल 112, नवी मुंबईपोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ
6. शशिकांत सातवपोलीस उप आयुक्त, नागपूर शहरपोलीस उप आयुक्त, छत्रपती संभाजीनगर शहर
7. रमेश धुमाळपोलीस उप आयुक्त, अमरावती शहरपोलीस उप आयुक्त, नागपूर शहर
8. पीयुष जगतापसमादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 17 चंद्रपूरअपर पोलीस अधीक्षक, खामगाव, बुलढाणा
9. नारायण शिरगांवकरसमादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13 गडचिरोलीसमादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट गट क्र. 19 अहिल्यानगर
10. प्रांजली सोनावणेपोलीस अधीक्षक, गुअवि, अमरावतीपोलीस उप आयुक्त, अमरावती शहर
11. दत्तात्रय शिंदेअपर पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयपोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख विभाग, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
12. संजय शिंत्रेपोलीस उप महानिरीक्षक, सायबर, मुंबईअपर पोलीस आयुक्त, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय
13. संजय वर्मापोलीस महासंचालक, न्यायिक व तांत्रिकपोलीस महासंचालक, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ
14. अर्चना त्यागीपोलीस महासंचालक, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळपोलीस महासंचालक, न्यायिक व तांत्रिक
15. विश्वास नागर पाटीलअपल पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागपोलीस आयुक्त, नागपूर शहर
16. रविंद्र सिंघलपोलीस आयुक्त, नागपूर शहरअपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com