जाहिरात

IPS Transfer: पोलीस दलात सर्वात मोठे फेरबदल! 7 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; नागपुरात डॅशिंग अधिकाऱ्याची एन्ट्री

नक्षलविरोधी कारवाई विभागात कार्यरत असलेले डॅशिंग अधिकारी संदीप पाटील यांची आता नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी वर्णी लागली आहे.

IPS Transfer: पोलीस दलात सर्वात मोठे फेरबदल! 7 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; नागपुरात डॅशिंग अधिकाऱ्याची एन्ट्री

Maharashtra IPS Officer Transfer: राज्य पोलीस दलातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गृह विभागाने पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल केले असून 'विशेष पोलीस महानिरीक्षक' दर्जाच्या ७ वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये नाशिक, नागपूर, अमरावती या विभागांसह ठाणे आणि मुंबईतील वरिष्ठ पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या तातडीने करण्यात आल्याचे शासनाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

21 वर्षात तुकाराम मुंढेंच्या बदलीची Silver Jubilee; दीड महिन्यात पुन्हा बदली, 3 अधिकाऱ्यांसाठीही मोठे आदेश

7 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिककरांसाठी महत्त्वाची अपडेट म्हणजे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पडवळ यांची मुंबईत बदली झाली असून, त्यांच्याकडे आता व्ही.आय.पी. सुरक्षेची जबाबदारी असेल. तर त्यांच्या जागी संजय येनपुरे हे नाशिक परिक्षेत्राचे नवे पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यभार हाती घेतील. यासोबतच, अमरावती परिक्षेत्राचे आयजी रामनाथ पोकळे यांची मुंबईत नियोजन व समन्वय विभागात बदली झाली असून, त्यांच्या जागी महेश पाटील हे अमरावतीचे नवे पोलीस प्रमुख असतील.

नागपूर आणि विदर्भाच्या दृष्टीनेही हा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. नक्षलविरोधी कारवाई विभागात कार्यरत असलेले डॅशिंग अधिकारी संदीप पाटील यांची आता नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी वर्णी लागली आहे. संदीप पाटील यांच्या अनुभवाचा नागपूर परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी फायदा होणार आहे.

​तसेच, ठाणे शहर पोलीस दलातही मोठा बदल झाला आहे. पंजाबराव उगले हे आता ठाणे शहराचे नवे पोलीस सह आयुक्त असतील. त्यांच्या नियुक्तीसाठी ठाण्यातील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) हे पद उन्नत करून सह आयुक्त दर्जाचे करण्यात आले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'महिला अत्याचार प्रतिबंध विभागा'च्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी शारदा राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शारदा राऊत या काही काळापासून पदस्थापनेच्या प्रतिक्षेत होत्या. या बदल्यांमुळे राज्य पोलीस दलातील वरिष्ठ पातळीवरील हालचालींना वेग आला आहे.

Pune News : तुरुंगात असूनही बंडू आंदेकरचं नेटवर्क पोलिसांपेक्षा वेगवान? पुण्याच्या गँगवॉरमधील मोठा गौप्यस्फोट

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com