जाहिरात

Nagpur News: "विश्वास नांगरे पाटील माझा एन्काऊंटर करतील"; काँग्रेस शहराध्यक्षांचा गंभीर आरोप

Nagpur News: नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. नांगरे पाटील हे 'अर्बन नक्षल' म्हणून माझा एन्काऊंटर करतील, अशी थेट भीती व्यक्त केली.

Nagpur News: "विश्वास नांगरे पाटील माझा एन्काऊंटर करतील"; काँग्रेस शहराध्यक्षांचा गंभीर आरोप

आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. मात्र, त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच नागपूरच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी नवनियुक्त पोलीस आयुक्तांवर थेट एन्काऊंटरचा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. "विश्वास नांगरे पाटील हे 'अर्बन नक्षल' असल्याचे सांगून माझा एन्काऊंटर करू शकतात," अशी जाहीर भीती गुडधे पाटील यांनी व्यक्त केली आहे. एका कथित हिंदू संमेलनातील विश्वास नांगरे पाटील यांच्या जुन्या व्हिडिओचा हवाला देत, काँग्रेस नेत्याने त्यांच्या घटनात्मक निष्पक्षतेवर थेट बोट ठेवले आहे.

"पोलीस आयुक्त रुजू होण्यापूर्वीच अविश्वासाचे वातावरण"

प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना विश्वास नांगरे पाटील यांच्या विचारसरणीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, "विश्वास नांगरे पाटील हे नागपूर पोलीस आयुक्त पदावर रुजू होण्यापूर्वीच आमच्या मनात त्यांच्याबद्दल अविश्वासाचे आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर नागपुरातील बिगर हिंदू धर्मीय नागरिकांच्या मनातही यामुळे मोठी असुरक्षितता निर्माण झाली आहे."

(नक्की वाचा-  Dharashiv News: ओमराजे निंबाळकरांची खासदारकी धोक्यात? मल्हार पाटलांच्या राजकीय चाल चर्चेत)

'हिंदू राष्ट्र'या असंवैधानिक संकल्पनेचे समर्थन केल्याचा आरोप

गुडधे पाटील यांनी पुढे आरोप केला की, "सोशल मीडियावर समोर आलेल्या एका हिंदू संमेलनातील व्हिडिओमध्ये विश्वास नांगरे पाटील हे केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उघड समर्थन करत नाहीयेत, तर ते मुळात 'असंवैधानिक संकल्पना' असलेल्या 'हिंदू राष्ट्र' या संकल्पनेचाही पुरस्कार करताना दिसत आहेत. ते एक आयपीएस पोलीस अधिकारी असल्याने त्यांचे विचार पूर्णपणे निरपेक्ष, पारदर्शक आणि निधर्मी असणे बंधनकारक आहे. मात्र, एका मोठ्या पदावरील अधिकाऱ्याने अशा प्रकारे एका विशिष्ट विचारसरणीची बाजू घेणे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे."

(नक्की वाचा-  MPSC च्या पूर्व परीक्षा होणार ऑनलाईन, 21 दिवसांत निकाल; मात्र विद्यार्थ्यांचा विरोध का?)

'अर्बन नक्षल'चा शिक्का मारून एन्काऊंटरची भीती

काँग्रेस शहराध्यक्षांनी थेट स्वतःच्या जिवाला धोका असल्याचे सांगत म्हटले की, ज्या पद्धतीने विरोधी विचारसरणीच्या लोकांना टार्गेट केले जात आहे, ते पाहता नागपुरात पाऊल ठेवल्यानंतर विश्वास नांगरे पाटील हे मला 'अर्बन नक्षल' ठरवून माझा एन्काऊंटर देखील घडवून आणू शकतात. विश्वास नांगरे पाटील यांच्यावर नागपुरात येण्यापूर्वीच काँग्रेसने थेट हल्ला केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com