आजपासून मध्य रेल्वे वेळेवर धावण्याची अपेक्षा आहे. नव्या यंत्रणेत पुर्वीप्रमाणे क्रॉसओव्हरवरून 70 मीटर पुढे गाडी गेल्यानंतर दुसरी गाडी चालवण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल वेळापत्रकानुसार धावणार असल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर. ओबीसींची शिष्टमंडळ आज मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. देशातील राजकीय घडामोडींचा विचार करता राहुल गांधी वायनाडमधील खासदारकी मागे घेतल्यानंतर प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
पुण्यात मर्सिडीज कारने 41 वर्षीय व्यक्तीला चिरडलं
पुण्यात मर्सिडीज कारने 41 वर्षीय व्यक्तीला चिरडलं
येरवडा भागात असणाऱ्या गोल्फ कोर्स जवळील घडला
केदार मोहन चव्हाण असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव
नंदू अर्जुन ढवळे असे चालकाचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले
वैद्यकीय तपासणीसाठी त्याला रुग्णालयात दाखल केले
येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुका जाहीर
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुका जाहीर, कधी असेल मतदान?
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जुलै असून 5 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. 12 जुलै रोजी मतदान आणि मतमोजणी असेल.
विधानसभेच्या रणनीतीसाठी काँग्रेसची दिल्लीत मोठी बैठक
महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेच्या रणनीतीसाठी काँग्रेसची दिल्लीत मोठी बैठक होणार आहे. 24, 25, 26 आणि 27 जून रोजी नवी दिल्लीत ही मोठी बैठक होणार आहे.
तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, यंदा कोणता विभाग?
तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, यंदा कोणता विभाग?
तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्त विकास आयुक्तपदी (असंघटीत कामगार) करण्यात आली आहे. गेल्या वर्षी त्यांची कृषी आणि ADF विभागात बदली करण्यात आली होती.
नीट परीक्षेतील गैरव्यवहार आरोपा प्रकरणी संभाजीनगरमध्ये काँग्रेस आक्रमक
नीट परीक्षेतील गैरव्यवहार आरोपाप्रकरणी काँग्रेस आक्रमक भूमिका घेतांना पाहायला मिळत आहे. वैद्यकीय पूर्व परीक्षा म्हणजेच नीट परीक्षेत विविध प्रकारचे गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. या विरोधात देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आले. अशात आता संभाजीनगरमध्ये आज काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हा युवक काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात येत असून, जालना लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. शहरातील क्रांती चौकात हे आंदोलन होत असून मोठया प्रमाणात विद्यार्थी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे.
ठाण्यात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले, डेंग्यूचे 48 तर 134 जणांना मलेरियाची लागण
ठाण्यात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले, डेंग्यूचे 48 तर 134 जणांना मलेरियाची लागण
ठाणे शहरात जानेवारी ते जून या सहा महिन्यात डेंग्यूचे 48 रुग्ण आढळले असून 134 जणांना मलेरियाची लागण झाली असल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसून उपचारानंतर हे सर्व रुग्ण बरे झाले असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या यावर्षी वाढली असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे, तर मलेरियाच्या रुग्णांमध्ये किंचित घट झाली असल्याचे प्रशासनाच्या आकडे वरून उघड झाले आहे..
बीड लोकसभेतील भाजपच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी संभाजी पाटील निलंगेकर यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती
बीड लोकसभेतील भाजपच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी संभाजी पाटील निलंगेकर यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती
बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा झालेला पराभवाची कारणे शोधण्यासाठी भाजपकडून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची पक्षाने बीड लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक म्हणून नेमणूक केली असून ते बीड लोकसभेच्या भाजपाच्या पराभवाची कारणमीमांसा करणार आहेत. यासाठी आमदार निलंगेकर हे पुढील काही दिवसातच बीडचा दौरा करणार असल्याची माहिती समजली आहे. याचबरोबर या दौऱ्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनेही आढावा घेतला जाणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुख्य धरणात पाणीसाठा किती आहे?
ठाणे जिल्ह्यातील मुख्य धरणात पाणीसाठा किती आहे?
भातसा
पाणी साठा- 213.07 दलघमी
टक्केवारी -22.62%
आज ची पाणी पातळी-103.95
मोडकसागर
पाणी साठा- 20.28 दलघमी
टक्केवारी -15.73 %
आज ची पाणी पातळी-147.39
तानसा
पाणी साठा- 31.98 दलघमी
टक्केवारी -22.05 %
आज ची पाणी पातळी-121.60
म.वैतरणा
पाणी साठा- 18.66 दलघमी
टक्केवारी -9.64 %
आज ची पाणी पातळी-238.24
बारवी
पाणी साठा-86.48 दलघमी
टक्केवारी -25.52 %
आज ची पाणी पातळी-58.80
13 जुलैच्या आत मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण हवं - जरांगे पाटीस
13 जुलैच्या आत मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण हवं आहे. ओबीसी नेते मराठा समाजाबाबत विष पसरवत आहेत - मनोज जरांगे पाटील
कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा
कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग विरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार आहे. कोल्हापुरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा असणार आहे. नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा लढा उभारलेला आहे. कोल्हापुरातल्या आजच्या मोर्चात सांगलीसह इतरही काही जिल्ह्यातून शेतकरी सामील होतील असं सांगण्यात आलं आहे. सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. सर्वपक्षीय असा हा मोर्चा असणार आहे.
निर्जला एकादशीनिमित्त पंढरपुरात मोठी गर्दी, दर्शनासाठी 5 तासांची प्रतीक्षा
निर्जला एकादशीनिमित्त पंढरपुरात मोठी गर्दी, दर्शनासाठी 5 तासांची प्रतीक्षा
निर्जला एकादशीनिमित्ताने आज पंढरपुरात लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. हरिनामाचा गजर मुखी विठ्ठल विठ्ठल नाम अशा जयघोषात पंढरी नगरी दुमदुमून गेली होती. आषाढी एकादशी पूर्वी येणारी निर्जला एकादशीला वारकरी संप्रदायात अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे या एकादशीला भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरात येऊन विठ्ठल दर्शन घेतात. एकादशीनिमित्त मंदिर परिसर नामदेव पायरी चंद्रभागा वाळवंट हा भाग वारकऱ्यांनी फुलून गेला होता. आज विठ्ठल दर्शनासाठी सुमारे पाच तासांचा कालावधी लागत होता.
या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता
या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता
या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे. पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून सुरू होत असून त्या आधी विस्तार करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भेट घेतल्याची माहिती आहे.
राज्यपाल नियुक्त 12 आमदारासंदर्भातील याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी
राज्यपाल नियुक्त 12 आमदारासंदर्भातील याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना उबाठाचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी याबाबतची याचिका दाखल केली आहे. दुपारी 12 वाजता यावरील युक्तीवाला सुरुवात होईल.
कांचनजुंगा एक्स्प्रेस अपघातात 8 जणांचा मृत्यू, 25 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू
लोकसभा अध्यक्षपद भाजपा स्वत:कडेच ठेवणार?
लोकसभा अध्यक्षपद भाजपा स्वत:कडेच ठेवणार, 25 जूनपर्यंत नावाचा प्रस्ताव ठेवला जाणार, विरोधकांची उपाध्यक्ष पदाची मागणी
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये साठा कमी
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये साठा कमी झाला, पुढचे 20 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याची माहिती
शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथील गव्हा निपाणी शेत शिवारात पेरणीपुर्व मशागतीचे काम करीत असताना पिंपळखुटा येथील एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पावसाचे आगमन झाल्याने पेरणीपूर्व मशागतीने वेग घेतला आहे. त्यासाठी शेतकरी महादेव नंदू उके हे गव्हा निपाणी शेत शिवारात पेरणीपुर्व मशागतीच्या कामासाठी शेतात गेले होते. दरम्यान त्यांना हृदयविकाराच्या झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय..