Pune Rain News: महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट घोंघावत असून हवामान विभागाने 31 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत राज्याच्या विविध भागात पावसाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वातावरणात मोठी अस्थिरता निर्माण झालीय. अनेक जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 60 किमी वेगाने वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके काढणीच्या अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. हवामान बदलानुसार कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
31 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत कोणत्या जिल्ह्याला पावसाचा कोणता अलर्ट देण्यात आला आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती
31 मार्च
अलर्ट: ऑरेंज अलर्ट
गारपीट, मेघगर्जना, विजांचा कडकडाट,वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
कुठे : नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली
अलर्ट: यलो अलर्ट
मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
कुठे : नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया
उर्वरित भागात तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
1 एप्रिल
अलर्ट: यलो अलर्ट
मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
कुठे : सोलापूर, धाराशिव, लातूर, वाशिम, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे.
उर्वरित भागात तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
(नक्की वाचा: Maharashtra Unseasonal Rain: अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले; पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल)
2 एप्रिल
अलर्ट: यलो अलर्ट
जोरदार वाऱ्यासह मेघगर्जना आणि पावसाची शक्यता
कुठे: सोलापूर, धाराशिव, लातूर, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी, बीड, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नंदुरबार, धुळे, ठाणे, बुलढाणा, अकोला, अमरावती, जालना, नंदुरबार, परभणी, हिंगोली.
उर्वरित भागात तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
(नक्की वाचा: Weather Update: महाराष्ट्रावर अस्मानी संकट कायम! पुढील 3 तास 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा)
3 एप्रिल
अलर्ट: यलो अलर्ट
जोरदार वाऱ्यासह मेघगर्जना आणि पावसाची शक्यता
कुठे: जळगाव, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.
कोणती काळजी घ्यावी?
- मेघगर्जना व पावसाची शक्यता लक्षात घेऊन काढणी झालेल्या पिकांचे सुरक्षित साठवण करावे.
- शेतात ठेवलेले उत्पादन ताडपत्रीने झाकून ठेवावे.
- वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे शेतातील हलकी संरचना आणि शेती उपकरणे सुरक्षित ठेवावीत.
- शेतामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी तात्काळ निचऱ्याची व्यवस्था करावी. पाणी साचल्यास मुळकुज आणि बुरशीजन्य रोग वाढू शकतात.
- सध्या राज्यातील अनेक भागात गहू, मक्का, रबी ज्वारी ही पिके काढणीच्या अवस्थेत आहेत.
- काढणी केलेले उत्पादन पावसापासून संरक्षित ठिकाणी ठेवावे.
- पुढील 24 तासांत काढणीस तयार असलेली पिके तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
- शेतात मळणीसाठी ठेवलेले धान्य ताडपत्री किंवा प्लास्टिक आच्छादनाखाली ठेवावे.
- ज्वारी पीक पिकलेल्या अवस्थेत असून पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ज्वारीचे ताटे पडण्याची शक्यता आहे
- त्यामुळे कणसे खराब होऊन ज्वारीचे नुकसान होऊ शकते, म्हणून काढणी केलेली ज्वारी सुरक्षित ठिकाणी ठेवावी आणि शक्य नसल्यास पॉलिथिन पेपरने झाकून संरक्षण करावे.
- विजांच्या कडकडाटाच्या वेळी जनावरे झाडाखाली किंवा धातूच्या कुंपणाजवळ बांधू नयेत.
- जनावरे शक्यतो बाहेर चरावयास नेऊ नयेत.
काय करावे
- मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने फळबागा तसेच भाजीपाला पिकाला आधार द्यावा.
- शेतात असताना कोणताही निवारा मिळाला नसेल तर त्या परिसरातील सर्वात उंच वस्तू टाळून जर फक्त तुरळक झाडे जवळपास असतील तर सर्वात चांगले संरक्षण म्हणजे आपले पाय पोटाशी धरून बसावे.
- मेघगर्जना होत असल्यास झाडाखाली उभे राहू नये.
- प्राण्यांना खुले पाणी, तलाव किंवा विहिरीपासून दूर ठेवावे.
- प्राण्यांना ट्रॅक्टर आणि इतर धातूच्या शेतीच्या उपकरणापासून दूर ठेवावे.
- शेतातील उभ्या पिकामधून अतिरिक्त पावसाचे पाणी काढून टाकावे.
- जर शेतातील पिक, उत्पादन शेतात राहिले असल्यास पॉलिथिन शीटने झाकून ठेवावे.
शेतात असताना पाऊस पडत असेल तर या गोष्टी टाळाव्या
- विद्युत उपकरण किंवा वायर/केबल यांचा संपर्क टाळा.
- कोणत्याही धातू ट्रॅक्टर, शेतीची उपकरणे आणि दुचाकीचा संपर्क दूर ठेवावा.
- आपल्या प्राण्यांना झाडाखाली जाऊ देऊ नका. प्राण्यांकडे लक्ष ठेवा आणि त्यांना आपल्या थेट नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world