महाविकास आघाडीच्या चर्चेत नवा ट्विस्ट, काँग्रेसकडून नाना पटोलेंऐवजी 'हा' नेता करणार पवार-ठाकरेंशी चर्चा

Maharashtra Election 2024 : नाना पटोले यांच्या महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होईल असं अनेक नेत्याकंडून बोललं जात होतं. शरद पवार यांनी मध्यस्थी करत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती देखील सूत्रांकडून समोर आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

रामराजे शिंदे, नवी दिल्ली

महाविकास आघाडीच्या जागावाटपात नवा ट्विस्ट आला आहे. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याऐवजी आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबत बोलणी करण्यासाठी बाळासाहेब थोरात जाणार आहेत. ठाकरे गटाच्या दबावामुळे हा बदल झाल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीची उद्या 3 वाजता मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शरद पवार  आणि उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करण्याची तडजोड करण्याची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर असणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाने टाकलेल्या दबावाला काँग्रेस बळी पडत आहे की काय? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 

नाना पटोले विदर्भातील एकही जागा सोडायला नव्हते. त्यामुळे महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा पुढे सरकत नव्हती, असं देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आता संयमी आणि शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीक असेलल्या बाबासाहेब थोरात यांच्यावर चर्चेची जबाबदारी दिली आहे. 

(नक्की वाचा- NCP First List : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 16 उमेदवार ठरले; 'या' नेत्यांना एबी फॉर्म मिळाले)

नाना पटोले यांच्या महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होईल असं अनेक नेत्याकंडून बोललं जात होतं. शरद पवार यांनी मध्यस्थी करत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती देखील सूत्रांकडून समोर आली होती. त्याचाच हा परिणाम असल्याची बोललं जात आहे. 

(नक्की वाचा-  BJP First List : भाजपच्या पहिल्या यादीची वैशिष्ट्ये काय? 99 उमेदवार कोण? वाचा सविस्तर)

उद्धव ठाकरे विदर्भातील 12 जागांवर दावा करत आहेत. त्यामुळे आता तडजोडीअंती ठाकरे गट किती जागा मिळवणार हे पाहावं लागेल. मात्र या चर्चांमुळे महाविकास आघाडीची यादी जाहीर होण्यास आणखी उशीर होण्याची शक्यता आहे. पक्षांर्तंग बंडखोरी टाळण्यासाठी देखील यादी जाहीर करण्यास उशीर केला जात असल्याची चर्चा आहे.