'मविआ'ला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची दाट शक्यता; केजरीवाल सरकारचा फॉर्म्युला लागू होणार?

महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता निवड कोणत्या नियमानुसार होते, त्यासाठीचा कायदा कोणता, अशी विचारणा करणारे पत्र शिवसेना ठाकरे गटाने मध्यवर्ती कार्यालयातर्फे विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना 10 दिवसांपूर्वी पाठवले होते. 

जाहिरात
Read Time: 2 mins

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा लाजिरवाणा पराभव झाला. महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवत 230 जागा जिंकल्या. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद मिळावे एवढ्या जागा देखील महाविकास आघाडीकडे नाहीत. मात्र विरोध पक्षनेते पद मिळावे यासाठी महाविकास आघाडीता धडपड सुरु केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना रविवारी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली. केजरीवाल सरकारचा फॉर्म्युला वापरून महाविकास आघाडील विरोधी पक्षनेते पद मिळू शकते. 

दिल्लीत अरविंद केजरीवाल सरकारने भाजपला तीन आमदार असूनही विरोधी पक्षनेतेपद दिले होते. तसेच महाराष्ट्रातही होईल का? याची उत्सुकता आता सगळ्यांना लागली आहे. राज्यात विरोधी पक्षांकडे पुरेसे संख्याबळ नसताना त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळेल का याची चर्चा सुरू झाली आहे.

(नक्की वाचा: 'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? रामदास आठवलेंचा रोखठोक सवाल)

महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता निवड कोणत्या नियमानुसार होते, त्यासाठीचा कायदा कोणता, अशी विचारणा करणारे पत्र शिवसेना ठाकरे गटाने मध्यवर्ती कार्यालयातर्फे विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना 10 दिवसांपूर्वी पाठवले होते. 

या पत्रात विरोधी पक्षनेता निवडीच्या नियमांची माहिती आणि कायदेशीर बाबींची तरतूद लिखित स्वरूपात तत्काळ अवगत करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही माहिती अद्याप मिळाली नसल्याने रविवारी ठाकरे गटाचे गटनेते भास्कर जाधव यांनी विधिमंडळ सचिवांची भेट घेऊन पुन्हा ही माहिती देण्यासंदर्भात सचिवांना विनंती केली. 

Advertisement

(नक्की वाचा- - एकनाथ खडसेंचे फडणवीसांबाबत मोठे वक्तव्य, मोठी घडामोड होणार?)

विधानसभेचे अध्यक्ष म्हणून पुन्हा राहुल नार्वेकर यांची निवड जवळपास निश्चित आहे. नार्वेकर यांनी याबाबत म्हटलं की, "विधानसभेत विरोधी पक्षाचा नेता बनवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो. आधीचे रेकॉर्ड असतात ते बघूनच निर्णय घेतले जातात.  जेव्हा माझ्याकडे असे प्रपोजल येईल तेव्हा मी विचार करून निर्णय घेईन. 13 कोटी जनतेच्या अशा-आकांक्षा घेऊन आमदार इथे येतात. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद महत्त्वाचे आहे."