अभिनेत्री मलायका अरोराचे वडिल अनिल मेहता (Malaika Arora Father's Death) यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम झालं आहे. या रिपोर्टमधून त्यांच्या मृत्यूचं कारण समोर आलं आहे. अनिल मेहता यांचा बुधवारी (11 सप्टेंबर) रोजी मृत्यू झाला. शरीरावरील अनेक जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक रिपोर्टमधून स्पष्ट झालीय. बुधवारी रात्री मुंबईतील कुपर हॉस्पिटलमध्ये हे पोस्टमार्टेम झालं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आत्तापर्यंतचे अपडेट्स
सुसाइड नोट नाही : अनिल मेहता यांच्या मृत्यूचं प्राथमिक कारण आत्महत्या असल्याचं दिसत आहे. पण, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वांद्रे पोलिसांनी याला पूर्णपणे दुजोरा दिलेला नाही. 62 वर्षांच्या अनिल मेहता यांनी कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही.
डिप्रेशनमध्ये होते मेहता? : मलायका आरोरांच्या वडिलांची तब्येत खराब असल्याची माहिती समोर आली आहे. ते खराब तब्येतीमुळे डिप्रेशनमध्ये होते, असं सांगितलं जातंय. त्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची शक्यता आहे.
डायरीचा तपास सुरु : 'टाईम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार पोलीस मेहता यांच्या डायरीचा शोध घेत आहेत. त्या डायरीमधून मृत्यूचं रहस्य समजू शकेल, अशी पोलिसांना अपेक्षा आहे. मेहता यांची मृत्यूपूर्वी कशी मनस्थिती होती, हे त्या डायरीमधून समजू शकेल.
CCTV फुटेज : बुधवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान मेहता यांच्या त्यांच्या फ्लॅटमधील बाल्कनीमधून मृत्यू झाला. वांद्रे पोलीस सीसीटीव्ही फुटेजचाही शोध घेत आहे. त्यामधून मेहता नेमकं कसं पडले हे समजू शकेल.
( नक्की वाचा : Malaika Arora च्या वडिलांचा मृत्यू कसा झाला? शेजाऱ्यानं सांगितल्या धक्कादायक गोष्टी )
प्रकरणाशी संबधित महत्त्वाचे अपडेट
- मलायका अरोराचे वडिल अनिल मेहता यांनी आत्महत्या आहे की अपघात ? या प्रश्नाचा सर्व बाजूंनी पोलीस तपास करत आहेत.
- हे प्रकरण आत्महत्येचं असावं असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. पण, त्यांचा तपास अद्याप सुरु आहे.
- मलायका अरोराच्या वडिलांचे नाव अनिल अरोरा नाही तर अनिल मेहता आहे. ते तिचे सावत्र वडिल होते.
- अनिल मेहता यांनी मृत्यूपूर्वी मलायका आणि अमृता या त्यांच्या दोन्ही मुलींशी संभाषण केले होते.
- अनिल मेहता यांनी फोनवर सांगितलं होतं - "I'm sick and tired"
( नक्की वाचा : चित्रपटाच्या बदल्यात लैंगिक शोषण, एन्ट्रीसाठी कोड नेम! सिनेमाच्या सर्वात 'डर्टी पिक्चर'च काळं सत्य )
काय म्हणाली मलायका ?
वडिलांच्या मृत्यूनंतर मलायका तातडीनं मुंबईत दाखल झाली, तिचे अनेक जवळचे मित्र यावेळी मलायकाचं सांत्वन करण्यासाठी उपस्थित होते. अनिल मेहता तिचे सावत्र वडिल असले तरी त्यांचं दोन्ही मुलींशी चांगलं बॉन्डिंग होतं.
मलायकानं इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी वडिलांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केलाय. तसंच त्यांनी बिकट परिस्थितीमध्ये प्रायव्हसी देण्याची मीडियाला विनंती केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world