Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात धक्कादायक प्रकार, एका तरुणामुळे रेल्वे सेवा खोळंबली अन्..खळबळजनक व्हिडीओ

कल्याण रेल्वे स्थानकात सर्वात भयंकर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. एक व्यक्ती रेल्वे खांबावर चढल्याने जवळपास दोन तास रेल्वे सेवा खोळंबली होती. खळबळजनक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan Railway Station Video Viral
मुंबई:

Kalyan Railway Station Video Viral : कल्याण रेल्वे स्थानकात सर्वात भयंकर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. एक व्यक्ती रेल्वे खांबावर चढल्याने जवळपास दोन तास रेल्वे सेवा खोळंबली होती. कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1,1(a) 2 ,3 ,4 नंबर या पाच फलाटावर दीड तास रेल सेवा ठप्प होती. दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा व्यक्ती रेल्वे खांबावर चढला. परंतु, त्याला वीजेचा धक्का बसल्याने तो खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. या जखमी व्यक्तीला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

कल्याण रेल्वे स्थानकात नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार,हा व्यक्ती दुपारी दीड वाजता रेल्वे खांबावर चढला. त्यानंतर आरपीएफ जवानांनी त्याची समजूत काढून त्याला खाली उतरायला सांगितलं. परंतु, तो एका खांबावरून दुसऱ्या खांबावर चालू लागला. त्यानंतर रेल्वेने दोन आणि तीन फलटावर विद्युत पुरवठा बंद केला.

Advertisement

इथे पाहा रेल्वे खांबावर चढलेल्या व्यक्तीचा भयानक व्हिडीओ

 त्या व्यकीने पोलिसांकडे फोनची मागणी केली. त्याला मोबाईल फोन देण्यात आला. त्यानंतर त्याने तो खिशात टाकला. पण अर्ध्यातासानंतर त्याने तो फोन खाली फेकला. त्याचदरम्यान त्याला करंट लागल्याने तो खाली पडला. हा व्यक्ती कोण आहे? त्याने असं भयानक कृत्य का केलं? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.