जाहिरात

Nagpur Crime : मोबाईलवरुन मित्रानेच घेतला मित्राचा जीव, नागपूरमधील खळबळजन घटना

Nagpur Murder Case : मित्राने मित्राचीच लाडकी दांडक्याने मारहाण करत जीव घेतला आहे. नागपूरच्या हिवरी नगर नंदनवन परिसरात ही घटना घडली आहे. 

Nagpur Crime : मोबाईलवरुन मित्रानेच घेतला मित्राचा जीव, नागपूरमधील खळबळजन घटना

संजय तिवारी, नागपूर

Nagpur Crime News : मित्रांमध्ये सुरु असलेली मस्करी एका तरुणाची जीवावर बेतली आहे. मित्रांसमोर थापड मारली याचा राग सहन न झाल्याने मित्राने मित्राचीच लाडकी दांडक्याने मारहाण करत जीव घेतला आहे. नागपूरच्या हिवरी नगर नंदनवन परिसरात ही घटना घडली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नागपूर येथून पोलीस ठाणे पारडी हद्दीतील नवीन नगर येथे 40 वर्षीय जितेन्द्र उर्फ जितू राजू जयदेव हे आपल्या जुन्या मित्रांना भेटायला आले होते. सहज एकमेकांची खोड काढत असताना  त्यांचा मित्र आरोपी ईतवारीदास शिवदास माणिकपूरी याच्यासोबत मोबाईल घेण्यावरून वाद झाला. 

(नक्की वाचा-   मित्राची श्रीमंती बघवेना, दुसऱ्याने रचला भयंकर कट, कोल्ड्रिंक पाजून केलं असं काही..)

यावेळी आरोपीने जितूला म्हटले की, "तू माझा मोबाईल लपवला असून आताच्या आता माझा लपवलेला मोबाईल देऊन टाक." यावर जितू याने "माझ्याकडे मोबाईल नाही", असे म्हटले. यावरून त्यांच्यात वाद झाला. इतवारीदास समजून घेत नाही, असा विश्वास झाल्याने जितू याने रागात आरोपीला कानाखाली मारली. नेमका याचाच आरोपीला राग आल्याने त्याने "थांब, तुला पाहुन घेतो" असे म्हणत निघून गेला. 

(नक्की वाचा- महिलेचा 91 वर्षांच्या पतीवर संशय, संतापलेल्या वृद्धाने उचललं धक्कादायक पाऊल; प्रकरण पोहोचलं कोर्टात)

जितू हा तेथील पानटपरीजवळ फुटपाथवर बसलेला असताना आरोपीने लाकडी दांड्याने जितूचे डोक्यावर, पाठीमागे मारहाण करुन गंभीर जखमी केले आणि पळून गेला. पारडी पोलिसांनी मिळालेल्या सूचनेवरून त्वरीत दखल घेत जखमी जितूला जवळी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

याप्रकरणी पारडी पोलिसांनी आरोपीचा त्वरीत शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. पोलीस ठाणे पारडी येथे आरोपीविरूद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: