Mumbai News : चित्रपटाच्या पडद्यावरील 'रिस्टार्ट'च्या घोषणेने देशातील लाखो तरुणांना प्रेरणा देणारे मनोज कुमार शर्मा आता मुंबईचे नवीन सह पोलीस आयुक्त म्हणून कायदा सुव्यवस्था हाती घेणार आहेत. आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांना मुंबई पोलीस दलात एक मोठी आणि अत्यंत संवेदनशील जबाबदारी देण्यात आली आहे.
'12th फेल' या ब्लॉकबस्टर चित्रपटातून घराघरात नाव कमावलेल्या २००५ बॅचचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची मुंबईचे नवे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) म्हणजेच जॉइंट सीपी (कायदा व सुव्यवस्था) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संघर्षातून यशाच्या शिखरावर पोहोचलेले मनोज शर्मा यांनी यापूर्वी देखील राज्य कायदा आणि सुव्यवस्था विभागात आपली भूमिका बजावली होती. आता आर्थिक राजधानी मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेची सूत्रे त्यांच्या हातात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कठीण परिस्थितीतून उभं राहिलं समाजाभिमूख नेतृत्व...
मनोज कुमार शर्मा यांच्या नियोजनाचं मोठं कौतुक केलं जातं. मुंबईत होणारे मोर्चे असो वा आंदोलन. त्यांच्यापर्यंत कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी पोहोचते तेव्हा ते पूर्ण तयारीने मैदानात उतरतात. मनोज कुमार हे कोणत्याही गोष्टीसाठी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये संकटाला सामोरं जायला तयार असतात.
मनोज कुमार यांनी आपल्या करिअरमध्ये मुंबईच्या जीसीपी झोन-१ आणि एडिशनल कमिश्वर ऑफ पोलीस म्हणून काम केलं आहे. मनोज शर्मा एएमपीच्या मुरैना जिल्ह्यातील बिलगावातील राहणारे आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण गावात झालं. सुरुवातील ते अभ्यासात फार चांगले नव्हते. नववी आणि दहावी तिसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण झालेला मनोज शर्मा बारावीत नापास झाले होते. मात्र त्यांचं आयपीएस होण्याचं स्वप्न होतं. यानंतर त्यांच्या संघर्षाला सुरुवात झाली. त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिल्लीतील मोठ्या लोकांचे कुत्रा फिरवण्याचंही काम केलं.
मुंबई पोलीस दलात एक नवऊर्जा आणि नवचैतन्य....
'१२th फेल' चित्रपटानंतर मनोज कुमार शर्मा जनतेच्या घराघरात पोहोचले. त्यांच्यावर आलेल्या चित्रपटानंतर पोलीस दलामध्ये देखील त्यांचे अनेक फॅन्स तयार झाले आहेत. अनेक तरुण-तरुणी यांना देखील त्यांच्या चित्रपटातून प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आलेल्या नियमांचं काटेकोरपणे आणि मनापासून पालन होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सोबतच मुंबई पोलीस दलात एक नवं ऊर्जा नवचैतन्य एका महत्त्वपूर्ण अभ्यासू आणि अनुभवी माणसाच्या देखरेखीखाली मुंबई पोलिसांचा देखील एक नवा चेहरा दिसून येईल अशी चर्चा मुंबई पोलीस दलात सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world