Navi Mumbai APMC VIDEO: सावधान! आंब्यामुळे कॅन्सरचा धोका? वाशी मार्केटमधील 'त्या' स्टिंग ऑपरेशनने खळबळ

APMC Market Sting operation video: वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये आंबे पिकवण्यासाठी धोकादायक 'कॅल्शियम कार्बाईड'चा वापर होत असल्याचा खळबळजनक खुलासा एका स्टिंग ऑपरेशनमधून झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Navi Mumbai APMC VIDEO: सध्या बाजारात रसरशीत आणि पिवळेधमक आंबे दिसत आहेत. मात्र, जर तुम्ही हे आंबे खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडं थांबा! कारण हाच पिवळा आणि रसरशीत दिसणारा आंबा तुमच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. 

वाशी एपीएमसी मार्केटमध्ये स्टिंग ऑपरेशन

सोशल मीडियावर सध्या वाशीच्या एपीएमसी मार्केटमधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एका जागरूक नागरिकाने स्टिंग ऑपरेशन करत आंबे पिकवण्यासाठी सर्रासपणे केमिकलची फवारणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. यामध्ये कामगार आणि मालक आंबे लवकर पिकवण्यासाठी बंदी असलेल्या रसायनांचा वापर करताना दिसत आहेत.

Advertisement

कॅल्शियम कार्बाईडचा वापर

आंबे नैसर्गिकरीत्या पिकण्याऐवजी 'कॅल्शियम कार्बाईड'चा वापर करून अवघ्या काही तासांत पिवळे केले जातात. हे रसायन आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. कॅल्शियम कार्बाईडला भारतात पूर्णपणे बंदी आहे. कॅल्शियम कार्बाईड पाण्याच्या संपर्कात आल्यावर अॅसिटिलीन वायू तयार होतो, जो फळे कृत्रिमरित्या पिकवतो. यात आर्सेनिक आणि फॉस्फरससारखे विषारी घटक असतात.  FSSAI च्या नियमांनुसार असे फळ विकणे हा गंभीर गुन्हा आहे.

(नक्की वाचा-  DMart VIDEO: डीमार्टमध्ये जात असाल तर सतर्क राहा! एक चूक महागात पडेल)

दुष्परिणाम काय आहेत? 

यामुळे डोकेदुखी, चक्कर, उलट्या, पोटदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता आहे. याशिवाय याचा थेट परिणाम लिव्हर आणि किडनीवर होतो. कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो. लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्धांवर या रसायनाचा परिणाम लवकर होतो. त्यामुळे आंबे खरेदी करताना अतिशय चमकदार आंबे घेणं टाळा आणि आंबे खाण्यापूर्वी ते स्वच्छ धुवा.

(नक्की वाचा-  Dombivli News: खाऊ आणायला गेलेली आई आलीच नाही; 3 चिमुरड्यांचे रस्त्यावरच रडून-रडून हाल!)

नैसर्गिक की केमिकलने पिकवलेला आंबा कसा ओळखाल?

कार्बाईड वापरलेला आंबा पूर्णपणे एकसारखा पिवळा किंवा केशरी दिसतो. नैसर्गिक आंबा कुठे हिरवा तर कुठे पिवळा असा मिश्र रंगाचा असतो. नैसर्गिक आंब्याला विशिष्ट गोड सुगंध असतो, तर केमिकलवाल्या आंब्याला वास नसतो किंवा रसायनाचा वास येतो.

Advertisement

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर NDTV ची टीम प्रत्यक्ष वाशी एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाली. तेथील कामगारांनी हे आरोग्यासाठी हानिकारक नसल्याचा दावा केला असला तरी, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या आंब्यांचे नमुने चाचणीसाठी घेतले आहेत. 
 

Topics mentioned in this article