जाहिरात

टोकाची टीका करणाऱ्या जरांगेसाठी CM फडणवीसांचा मदतीचा हात, परतीच्या प्रवासासाठी पाठवली खास अ‍ॅम्बुलन्स

जरांगे यांच्या उपोषणाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांची तब्येत बिघडली. त्यांना तातडीने ॲम्ब्युलन्सची गरज होती. याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही राजकीय हेतू न ठेवता, माणूस म्हणून मदतीचा हात पुढे केला.

टोकाची टीका करणाऱ्या जरांगेसाठी CM फडणवीसांचा मदतीचा हात, परतीच्या प्रवासासाठी पाठवली खास अ‍ॅम्बुलन्स

Mumbai News : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. सरकारने अनेक मागण्या मान्य केल्यानंतर अखेर पाचव्या दिवशी जरांगेंनी उपोषण सोडले. या आंदोलनादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकदा सडकून टीका केली होती. मात्र, उपोषण संपल्यानंतर जरांगे यांना ॲम्ब्युलन्सची गरज असताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता ती उपलब्ध करून दिली, या भूमिकेची चर्चा आता सर्वत्र सुरु आहे.

गेले पाच दिवस मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होते. या काळात त्यांनी सरकार आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकदा कठोर शब्दांत टीका केली होती. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच संयम राखला. जरांगे यांच्या तब्येतीची काळजी घेण्यापासून ते आंदोलनातील नियमांविषयी बोलण्यापर्यंत त्यांची भूमिका शांत होती.

(नक्की वाचा-  Maratha Reservation: जरांगेंना दिलेल्या कागदाचा काहीच उपयोग नाही, तो GR नव्हे माहितीपुस्तिका: विनोद पाटील)

जरांगे यांच्या उपोषणाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांची तब्येत बिघडली. त्यांना तातडीने ॲम्ब्युलन्सची गरज होती. याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही राजकीय हेतू न ठेवता, माणूस म्हणून मदतीचा हात पुढे केला. झालं असं की उपोषण संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी अॅम्बुलन्सची आवश्यकता होता. मात्र त्याचवेळी एका आंदोलनकर्त्याला छातीत दुखत असल्याने त्यालाही ॲम्ब्युलन्सची आवश्यकता होती. मात्र एकच अॅम्बुलन्स असल्याने मराठा आंदोलनकर्त्याला प्राधान्य देत ती त्याला देण्यात आली.

त्यावेळी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या मंगेश चिवटे यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून अॅम्बुलन्सची गरज असल्याचं त्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनीही क्षणाचाही विलंब न करता, मनोज जरांगे यांच्यासाठी अॅम्बुलन्स उपलब्ध करून दिली.

(नक्की वाचाManoj Jarange Patil Morcha : सरकारचा प्रस्ताव जरांगेंना मान्य, 'या' मागण्यांवर झाली सहमती, वाचा सविस्तर))

या घटनेनंतर देवेंद्र फडणवीस यांचं एक वाक्य सर्वांना आठवलं, ते म्हणजे, "आपल्यावर टोकाची टीका केली, आपली बदनामी केली होती. त्यांचा आपण बदला घेणार... त्यांना माफ केले हाच आपला बदला."

एकीकडे मनोज जरांगे यांनी सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना कठोर भाषा वापरली. तर दुसरीकडे फडणवीस यांनी माणूस म्हणून आणि राज्याचे मुख्यमंत्री आपलं कर्तव्य पार पाडले. त्यांच्या या भूमिकेचे राजकीय वर्तुळात आणि सामान्य नागरिकांमध्ये कौतुक होत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com