
Manoj Jarange Maratha Morcha Mumbai : मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलकासह चार दिवसांपूर्वी (29 ऑगस्ट) मुंबईत दाखल झाले. यातील काही आंदोलक वाशीत थांबले तर उरलेले आंदोलक आझाद मैदान आणि परिसरात थांबले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस असल्याने त्यांना वाशी आणि सीएसएमटी स्थानकात आडोसा घेण्यासाठी जागा देण्यात आली होती. सध्या मराठा आंदोलकांच्या हुल्लडबाजीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Maratha Morcha Mumbai viral video) होत आहेत.
वाशी स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरात मराठा आंदोलक भररस्त्यात नाचताना दिसत आहेत. अनेकजण तर रस्त्यात खो-खो खेळत आहेत. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सीएसएमटी स्थानकात मराठा आंदोलकांनी दहीहंडी उभारली होती.
कोणी स्थानकाच्या खांब्यावर चढत आहे. तर कोणी सीएसएमटी स्थानकावर कुस्तीची स्पर्धाच भरवली होती.
सीएसएमटी स्थानकावर जेवणाची पंगत बसवण्यात आली होती. पोलिसांच्या बॅरिकेट्सचा वापर खेळण्यासाठी केला जात होता. या संदर्भातील अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दिवसेंदिवस सीएसएमटी स्थानकावरील गर्दी वाढत आहे. सीएसएमटी स्थानकाबाहेर आंदोलकांच्या गाड्या पार्क करण्यात आल्याने दक्षिण मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या दुसरीकडे वळवण्यात आल्या आहेत.
याशिवाय सीएसएमटी स्थानकाबाहेर मोठी गर्दी जमा झाली आहे. त्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया नोकरदार वर्गाकडून येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world