
Manoj Jarange Patil Maratha Morcha : मराठा आंदोलन शिगेला पोहोचत असताना (maratha reservation) मोठी बातमी समोर आली आहे. आज मराठा आंदोलन (maratha reservation) मुंबईत दाखल होणार आहे. सध्या मनोज जरांगे पाटील शिवनेरीवर दाखल झाले आहे. काही वेळात ते पुण्याच्या दिशेने निघतील. दरम्यान एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. जुन्नरमधील मराठा समाजाच्या आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख असं या आंदोलकाचं नाव आहे. ते मूळचे जुन्नरमधील असल्याचं सांगितलं जात आहे.
मराठा आंदोलनादरम्यान मनोज जरांगेंना धक्का...
मराठा आरक्षणाची मागणी शिगेला पोहोचली असताना एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या एका आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख असे मृत आंदोलकाचे नाव असून, ते मूळचे जुन्नरचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. (Maratha protester in Junnar dies of heart attack)
नक्की वाचा - Manoj Jarange Patil Maratha Morcha LIVE:जरांगे पाटील यांच्या मोर्चातील 3 वाहनांवर दगडफेक, मोठं नुकसान; एक जखमी
मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेल्या सतीश देशमुख यांचा पुणे जिल्ह्यात हृदयविकाराने मृत्यू झाला. सतीश देशमुख बीडच्या केज तालुक्यातील वरपगाव येथील रहिवासी आहेत. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे ते थांबलेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी संध्या, मुलगा प्रसाद आणि वृद्ध आई पुष्पा बाई असा परिवार आहे. सतीश देशमुख यांच्या अकस्मात निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठा आंदोलकाचा मृत्यू झाल्याने समाजावर शोककळा पसरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सतीश देशमुख या आंदोलनात सक्रिय सहभागी होते आणि आपल्या समाजासाठी लढा देत होते. मुंबई मोर्चासाठी निघाले असतानाच त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने देखमुख कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world