
Pune News : राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून असलेली पुण्याची ओळख झपाट्यानं बदलत आहे. पुणे शहरात गुन्हेगारी घटना सातत्यानं घडत आहेत. त्यामुळे पुणेकरांची सुरक्षितेची चिंता निर्माण झाली आहे. त्यातच एका व्यक्तीनं शुक्रवारी (22 ऑगस्ट) पुण्याजवळच्या पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडवली आहे.
पुण्याच्या रस्त्यावर एक बुरखा घातलेला माणूस धारदार शस्त्र घेऊन फिरताना दिसला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या व्यक्तीशी संबंधित एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यात तो विचित्र कपड्यांमध्ये दिसत आहे. त्याच्या हातात एक चाकूही दिसत आहे. एवढेच नाही तर त्याने आपल्या चेहऱ्यावर मास्कही लावला आहे. ही घटना पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधील आहे. हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहोचले असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

व्हिडिओमध्ये या व्यक्तीच्या चेहऱ्याची थोडीशी झलकही कैद झाली आहे. खरं तर, रस्ता ओलांडताना त्याने आपला मास्क थोडासा खाली केला, त्यामुळे त्याचा चेहरा व्हिडिओमध्ये कैद झाला. चेहऱ्यावरून ती व्यक्ती 50 वर्षांपेक्षा जास्त वयाची वाटत आहे. सध्या या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीस परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. ती व्यक्ती फक्त खोडसाळपणा करत होती की कोणावर तरी हल्ला करण्याच्या हेतूने फिरत होती, याचाही तपास पोलीस करत आहेत.
( नक्की वाचा : Pratap Sarnaik : तुम्हीही ओला-उबरच्या मनमानी भाड्याने हैराण आहात का? वाचा परिवहन मंत्र्यांनी काय केले )
पण ज्या प्रकारे त्याने कपडे घातले होते आणि हातात चाकू घेऊन फिरत होता, त्यामुळे लोकांना घाबरणे स्वाभाविक होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world