Mumbai News : मुंबईतील कांदिवली पूर्व येथील वेस्टर्न एक्सप्रेस वेवर साईधाम मंदिरासमोर धावत्या बेस्ट बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबईत रात्री हा प्रकार घडला. सायंकाळनंतर पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतुकीची मोठी ये-जा असते. त्यातच बेस्ट बसला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली.
मुंबईत बेस्ट बसला भीषण आग...
मुंबईत रात्रीच्या वेळी बेस्ट बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग इतकी भीषण होती की काही मिनिटांतच बस पूर्णतः जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अग्निशमन दलाकडून पुढील तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world