जाहिरात

Matheran News : 15 जूनपासून नेरळ-अमन लॉजदरम्यान टॉय ट्रेन बंद; पर्यटकांसाठी काय असेल पर्याय? पाहा शेड्यूल

मध्य रेल्वेने मान्सूनदरम्यान नेरळ-माथेरान नॅरोगेज लाइनच्या नेरळ-अमन लॉजवरील नियमित प्रवासी सेवा १५ जून २०२६ ते १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Matheran News : 15 जूनपासून नेरळ-अमन लॉजदरम्यान टॉय ट्रेन बंद; पर्यटकांसाठी काय असेल पर्याय? पाहा शेड्यूल

Matheran News : मध्य रेल्वेने मान्सूनदरम्यान नेरळ-माथेरान नॅरोगेज लाइनच्या नेरळ-अमन लॉजवरील नियमित प्रवासी सेवा १५ जून २०२६ ते १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात पर्यटक आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी माथेरान-अमन लॉजदरम्यान शटल सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सेवा दररोज उपलब्ध असतील. तर शनिवार आणि रविवारी अतिरिक्त विशेष फेऱ्याही असतील.

सर्व शटर सेवा ३ द्वितीय श्रेणी डबे, १ प्रथम श्रेणी डबे तर २ द्वितीय श्रेणी सह सामान वाहून नेणाऱ्या व्हॅनद्वारे चालवली जाईल. दररोज माथेरान ते अमन लॉजसाठी ६ शटल सेवा सकाळी ८.२० वाजेपासून सायंकाळी ५.२० पर्यंत धावतील. 


माथेरान-अमन लॉज शटल सेवा (दररोज)

1. 52154 माथेरन येथून सकाळी 08:20 वाजता प्रस्थान; अमन लॉज येथे सकाळी 08:38 वाजता आगमन
2. 52156 माथेरन येथून सकाळी 09:10 वाजता प्रस्थान; अमन लॉज येथे सकाळी 09:28 वाजता आगमन
3. 52158 माथेरन येथून सकाळी 11:35 वाजता प्रस्थान; अमन लॉज येथे सकाळी 11:53 वाजता आगमन
4. 52160 माथेरन येथून दुपारी 14:00 वाजता प्रस्थान; अमन लॉज येथे दुपारी 14:18 वाजता आगमन
5. 52162 माथेरन येथून दुपारी 15:15 वाजता प्रस्थान; अमन लॉज येथे १५:३३ वाजता आगमन
६. ५२१६४ माथेरान येथून १७:२० वाजता प्रस्थान; अमन लॉज येथे १७:३८ वाजता आगमन

नक्की वाचा - लोणावळा विरुद्ध महाबळेश्वर, काय सर्वात भारी? पुढच्या ट्रिपसाठी बेस्ट ठिकाण कसं निवडाल?

(शनिवार/रविवारी)

७. स्पेशल-२, माथेरान, प्रस्थान सकाळी १०:०५; अमन लॉज येथे आगमन सकाळी १०:२३
८. स्पेशल-४, माथेरान, प्रस्थान दुपारी १:१०; अमन लॉज येथे आगमन दुपारी १:२८

(ब) अमन लॉज-माथेरन शटल सेवा (दररोज)

1. 52153 अमन लॉज सकाळी 08:45 वाजता निघते; सकाळी 09:03 वाजता माथेरनला पोहोचते
2. 52155 अमन लॉज सकाळी 09:35 वाजता निघते; सकाळी 09:53 वाजता माथेरनला पोहोचते
3. 52157 अमन लॉज दुपारी 12:00 वाजता निघते; दुपारी 12:18 वाजता माथेरनला पोहोचते
4. 52159 अमन लॉज दुपारी 14:25 वाजता निघते; दुपारी 14:43 वाजता माथेरनला पोहोचते
5. 52161 अमन लॉज दुपारी 15:40 वाजता निघते; दुपारी 15:58 वाजता माथेरनला पोहोचते
6. 52163 अमन लॉज सायंकाळी 17:45 वाजता निघते; मथेरन येथे सायंकाळी १८:०३ वाजता पोहोचेल

(शनिवार/रविवार)
७. विशेष-१ अमन लॉज येथून सकाळी १०:३० वाजता सुटेल; माथेरन येथे सकाळी १०:४८ वाजता पोहोचेल
८. विशेष-३: अमन लॉज येथून दुपारी १:३५ वाजता सुटेल; माथेरन येथे दुपारी १:५३ वाजता पोहोचेल
१५ जूनपासून नेरळ आणि अमन लॉज दरम्यान टॉय ट्रेन सेवा चालणार नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com