Pune News: सहलीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे मावळ तालुक्यात पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. जाधववाडी धरण आणि पवना नदी अशा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकाच दिवशी चार तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यामध्ये सेल्फी काढताना पाय घसरून पडलेल्या मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात भोसरीतील तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागला.
जाधववाडी धरणातील थरार
भोसरी परिसरातील काही तरुण मावळ येथील जाधववाडी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी धरणाच्या पाण्यात उतरून सेल्फी काढण्याचा मोह त्यांना आवरला नाही. सेल्फी घेत असताना अचानक एकाचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला.
(नक्की वाचा- JPMorgan :'माझ्यासोबत झोपला नाहीस तर संपवून टाकेन'; बड्या कंपनीच्या महिला बॉसच्या धमकीने भारतीय तरुण उद्ध्वस्त)
पाण्यात पडलेल्या मित्राला वाचवण्यासाठी गेलेले इतर दोन मित्रही पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. अजय गारुडे, अनिकेत पवार आणि संतोष येडके अशी जाधववाडी धरणात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.
(नक्की वाचा- Raja Shivaji Collection: 'राजा शिवाजी'ची पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई, सैराटलाही टाकलं मागे)
पवना नदीतही एकाचा मृत्यू
जाधववाडी धरणातील या भीषण घटनेनंतर काही वेळातच पवना नदी पात्रातही आणखी एक दुर्घटना घडली. मनोज गौतम नावाच्या तरुणाचा पवना नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. अवघ्या एका दिवसात चार तरुण दगावल्याने मावळ आणि भोसरी परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world