रिझवान शेख, प्रतिनिधी
Mumbai News : ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान अखेर नवीन रेल्वे स्टेशनच्या मार्ग मोकळा झाला. ठाणे स्थानकावर वाढणारी प्रवाशांची लोकसंख्या याला लक्षात ठेवून अनेक वर्षापासून ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन स्थानकाची मागणी केली जात होती. रेल्वे मंत्रालयाने ठाणे आणि मुलुंड यांच्या दरम्यान नवीन रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी दिली आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मंजुरीबाबत माहिती दिली. वाढती लोकसंख्या आणि ठाणे व मुलुंड या दोन्ही स्थानकांवरील गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने आवश्यक आहे... ठाणे स्थानकावर दररोज सात ते आठ लाख प्रवासी लोकलच्या माध्यमातून प्रवास करतात.
ठाणेकरांना मोठा दिलासा...
मुंबई उच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर राज्य सरकारने २०२३ मध्ये ठाणे मनोरुग्णालयाच्या मालकीची १४.८३ एकर जागा रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी हस्तांतरित केली होती. या नवीन स्थानकामुळे गर्दीचे प्रमाण ३१ टक्क्यांनी कमी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. हे स्थानक प्रामुख्याने घोडबंदर रोड आणि वागळे इस्टेट परिसरातील प्रवाशांसाठी महत्वाचे स्थानक ठरणार आहे. सुरुवातीला ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन स्थानकाच्या उभारणीचा खर्च १२० कोटी रुपये असेल असा अंदाज होता. मात्र आता हा खर्च २४५ कोटी रुपयांहून अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली आहे की ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन स्थानकाचा खर्च रेल्वेने उचलावा. शिवसेच्या माध्यमातून अलीकडेच ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला 'धर्मवीर आनंद दिघे' यांचे नाव देण्यात यावा अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री यांना केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world