प्रतीक्षा पारखी, पुणे
आमदार बच्चू कडू महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. अशातच बच्चू कडू यांनी आज पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर बच्चू कडू महाविकाससोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र मी कुणावरही नाराज नाही. शेतकरी, मजूर, अंपगांच्या प्रश्नाबाबत शरद पवार यांची भेट घेतल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शरद पवार यांच्या भेटीनंतर बच्चू कडू यांनी म्हटलं की, "आजची भेट आधीच ठरली होती. काही मुद्द्यावर चर्चा करायची होती. शेतकरी, मजुरांचे, अंपगांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला 1 सप्टेंबरपर्यंत वेळ दिली आहे. त्यानंतर मी माझा पुढचा निर्णय घेईल."
(नक्की वाचा- 'घालीन लोटांगण...', शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न)
मला अंपग, शेतकरी, मजूरांचे प्रश्न महत्वाचे आहेत. हे प्रश्न सोडवणे महत्वाचं आहे. त्यासाठी मी काहीही निर्णय घेऊ शकतो. या मुद्यावरच कोणाबरोबर जायचे याचा निर्णय होईल. मी कोणावर ही नाराज नाही. राणा दाम्पत्यासोबत असलेला वादाचा येथे काहीही संबंध नाही, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- राज्यातील जालना-जळगावसह देशातील 8 नवीन रेल्वे मार्गांना केंद्रीची मंजुरी, कसा होईल फायदा?)
चांगल्या लोकांनी एकत्र काम करणे गरजेचे- सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे यांनी या भेटीबाबत म्हटलं की, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी जनतेचे सेवा करण्यासाठी चांगले बदल घडण्यासाठी प्रयत्न करतो. बच्चू भाऊंनी गेले अनेक वर्ष चांगलं काम करत समाजातील लोकांना मदत केलेली आहे. आम्ही सगळे महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी काम करतो. बच्चू कडूंनी चांगलं काम करून महाराष्ट्रातील एक दुर्लक्षित प्रश्नाला वाचा फोडली. माझी इच्छा आहे, महाराष्ट्रासाठी सगळ्या चांगल्या लोकांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.