
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग मराठीच्या पाचव्या सीजनची स्पर्धक अंकिता वालावलकर सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. 16 फेब्रुवारी रोजी कुणाल आणि अंकिता यांचा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवत वधू-वरांना आशीर्वाद दिले. मंत्री नितेश राणे देखील या विवाह सोहळ्याला उपस्थित होता.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अंकिता आणि कुणालने लग्नाचे निमंत्रण दिले होते. मात्र राज ठाकरे यांना नियोजित कार्यक्रमांमुळे उपस्थित राहता आले नाही. याबाबत राज ठाकरे यांनी अंकिताचे वडील प्रमोद वालावलकर यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली.

राज ठाकरे यांचे पत्र
श्री प्रमोद वालावलकर यांस सस्नेह जय महाराष्ट्र!
आपली कन्या चि. सौ. का. अंकिता हिच्या शुभ विवाहाचे आपण अगत्यपूर्वक पाठवलेले निमंत्रण मिळाले. त्याबद्दल धन्यवाद!
सदर मंगल सोहळ्यास उपस्थित राहण्यास निश्चितच आनंद वाटला असता. पंरतु पूर्वनियोजित दौऱ्यामुळे उपस्थित राहता येत नसल्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो.
आम्हा उभयतांकडून नव दाम्पत्यास शुभेच्छा! तसेच पुढील वैवाहिक आयुष्य सुख: समृद्धीचे व भरभराटीचे जावो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world